धुळ्यात भरदिवसा जेवणाच्या वादातून हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 06:24 PM2018-01-21T18:24:50+5:302018-01-21T18:25:26+5:30

हॉटेलमधील थरार : दहशत माजविण्याचा तरुणांचा प्रयत्न

Firing in the air by eating food for Dhule | धुळ्यात भरदिवसा जेवणाच्या वादातून हवेत गोळीबार

धुळ्यात भरदिवसा जेवणाच्या वादातून हवेत गोळीबार

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून हवेत गोळीबारहॉटेलमध्ये दहशत माजवित धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न चाळीसगाव रोड पोलीस फौजफाटा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून काही युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ यात एकाने गावठी कट्टा काढून गोळीबारही केला़ सुदैवाने जिवीतहानी झाली नसलीतरी भितीयुक्त वातावरण हॉटेल परिसरात मात्र निर्माण झाले होते़ 
शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळील एका हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन जण दाखल झाले़ यावेळी काही वेळातच जेवणाच्या वादावरुन हॉटेलचा कामगार आणि त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली़ दोघांमध्ये वाद झाल्याने हाणामारी झाली़ खुर्च्यांची फेका-फेक झाल्याने नुकसान झाले़ परिणामी तणावाची स्थिती निर्माण झाली़ अशात या दोघांनी काही जणांना मोबाईलवरुन संवाद करत बोलावून घेतले़ अल्पावधीतच ते शस्त्रास्त्रसहीत दाखल झाले़ यातील एकाने गावठी कट्टाच आणल्याने तणाव अधिकच वाढला होता़ त्याने गोळीबार केला़ पण, सुदैवाने गोळी कोणालाही लागली नसल्याने जिवीतहानी झाली नाही़ 
घटनास्थळावरुन हुल्लडबाजी करणारे तरुण पळून गेले़ तर भिती निर्माण झाल्याने हॉटेल कामगार देखिल नाहीसा झाला आहे़ घटनेचे वृत्त कळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ हे आपल्या पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले़ त्यांनी प्राथमिक तपासणी केली आहे़ सीसीटीव्ही फुटेजचे संकलन केले जाणार असून त्याद्वारे अधिक माहिती समोर येण्यास मदत होणार आहे़ 
दरम्यान, हॉटेलमध्ये दहशत माजवित धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न झाला़ गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे़ वस्तुत: तसे काही दिसत नसलेतरी तपासणीतून ही बाब समोर येईल़ सीसीटीव्हीचे फुटेजची पाहणी केली जाईल, असे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले़ 

Web Title: Firing in the air by eating food for Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.