शहीद योगेशच्या कुटुंबाला भारत सरकारकडून एक कोटी एक लाख रुपयांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:25 PM2018-01-18T15:25:33+5:302018-01-18T15:29:03+5:30

केंद्रीय राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी खलाणे येथे कुटुंबियांना दिले पत्र

Financial assistance of Rs.1.15 crore to the family of Shahid Yogesh's family by the Indian government | शहीद योगेशच्या कुटुंबाला भारत सरकारकडून एक कोटी एक लाख रुपयांची आर्थिक मदत

शहीद योगेशच्या कुटुंबाला भारत सरकारकडून एक कोटी एक लाख रुपयांची आर्थिक मदत

Next
ठळक मुद्देकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडून भदाणे कुटुंबाचे सांत्वनशहीद योगेशच्या बलिदानाचा भार तीय सैन्याने घेतला दुसºयाच दिवशी बदला तीन महिन्यात भदाणे कुटुंबाच्या खात्यावर होणार संपूर्ण रक्कम होणार जमा 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील खलाणे येथील शहीद योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्यावतीने १ कोटी १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याहस्ते देण्यात आले. 
शहीद कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे गुरूवारी सकाळी ११ वाजता खलाणे येथे आले. त्यांच्यासोबत प्रा.अरविंद जाधव, जि.प. सदस्य कामराज निकम, संजीवनी सिसोदे, राम भदाणे, भाजप तालुकाध्यक्ष नथा पाटील, कृउबाचे उपसभापती पंकज कदम, सरपंच भटू वाघ, विलास अहिरराव यांच्यासह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
या वेळी डॉ.भामरे यांनी शहीद योगेश यांच्या घरी त्यांची पत्नी पूनम, आई, वडील व त्यांच्या काकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि त्यांना केंद्र सरकारने एक कोटी  १ लाख २५ हजार ९६७ रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र दिले. शहीद योगेश यांची पत्नी पूनम यांची विचारपूस केली. तेव्हा पूनम यांनी सांगितले की, मला माझे शिक्षण पूर्ण करून जॉब करणार असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. भामरे यांना सांगितले
  शहीद योगेश यांच्या कुटूंबाचे सांत्वन करून ना डॉ. भामरे यांनी ग्रा.पं. कार्यालयात ग्रामस्थांसोबत पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, योगेश हा खलाणे गावाचाच पुत्र नसून तो संपूर्ण देशाचा पुत्र होता. शहीद हा कधीही मरत नसून तो अमर होत असतो. त्याच्या पाठीशी संपूर्ण देशासह लष्करही त्याच्यासोबत आहे. शहीद योगेशचा बलिदानाचा बदला दुसºया दिवशी भारतीय सैन्याने तेथेच पाकड्यांचे ७ सैनिक व ६ दहशतवादी ठार करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहीद योगेशचे पार्थिव आणण्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था केली. गेल्या तीन वर्षात आम्ही जगाला संदेश देण्यात सक्षम झालो असून भारत हा पूर्वीचा भारत नाही. तो जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. शहीद योगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारकडून त्यांना विविध हेड खाली एक कोटी एक लाख २५ हजार ९६७ रुपयेआर्थिक मदतीची घोषणा करून सदर रक्कम ही शहीद योगेशच्या कुटुंबाच्या खात्यावर ९० दिवसाच्या (तीन महिन्याच्या) आत  येतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कामराज निकम यांनी मानले.
 

Web Title: Financial assistance of Rs.1.15 crore to the family of Shahid Yogesh's family by the Indian government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.