भरधाव ट्रकची खांबाला धडक, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:52 PM2018-03-16T12:52:15+5:302018-03-16T12:52:15+5:30

धुळे शहर : महामार्गावरील कुंडाणे फाट्याजवळील घटना

Filled on the truck's pole, two wounded | भरधाव ट्रकची खांबाला धडक, दोन जखमी

भरधाव ट्रकची खांबाला धडक, दोन जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देकुंडाणे फाट्याजवळ घडला अपघातसुदैवाने जिवीतहानी टळलीमहामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहरानजिक असलेल्या कुंडाणे फाटाजवळ भरधाव वेगाने येणाºया ट्रकने खांबाला धडक दिली़ या अपघातात दोन जणांना दुखापत झाली आहे़ शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़  
मुंबई आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ टमाट्याचे प्लास्टिकचे कॅरेट भरलेला ट्रक सेंधवाहून येत होता़ ट्रक गतिरोधकाजवळ येताच टायर फुटल्याने चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. ट्रक उतारावर आल्याने गतीत वाढ झाली होती. सदर ट्रक रस्ताजवळील दुभाजकावर जावून धडकला आणि खांबावर आदळला़ यात कॅबिनसमोरील भागाचा चेंदामेंदा झाला़ दोन जण त्यात अडकले होते. त्यांना लोकांच्या व क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी जिल्हा रुग्णाल्यात रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले. देवपूर पोलीसात नोंद करण्याचे काम सुरु होते. काही वेळ वाहतूक संथ गतीने सुरु होती़ वाहन रस्ताच्या बाजूला केल्यावर पुर्ववत वाहतूक सुरु करण्यात आली

Web Title: Filled on the truck's pole, two wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.