बीएसएनएल कंपनीतील रिक्त पदे तत्काळ भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:50 PM2019-02-18T22:50:36+5:302019-02-18T22:51:34+5:30

देशव्यापी संप: धुळ्यासह नंदूरबार जिल्ह्यातील ४४५ कर्मचारी सहभागी

Fill vacant posts of BSNL Company immediately | बीएसएनएल कंपनीतील रिक्त पदे तत्काळ भरा

dhule

Next

धुळे : भारतीय संचार निगम लिमिटेड कंपनीत कार्यकर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१७ पासुन तिसरे वेतन संशोधन १५ टक्के फिटलेस लागु करावी यासह विविध मागण्यासाठी तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे़
१ जानेवारी २०१७ पासुन तिसरे वेतन संशोधन १५ टक्के फिटनेस लागू करावे, बीएसएनएल ने दिलेल्या प्रस्तावानुसार त्वरीत ४ जी स्पेक्ट्रक प्रदान करण्यात यावे, बीएसएनएल कडून सरकारीनियमानुसार पेन्शन कॉन्ट्रीव्युशन देण्यात यावे, पेंशन रिवीजनला पे रिवीनशी वेगळे करण्याचे आदेश लागू करावे, दुसºया वेतन संशोधनातील थकीत मुद्दे निकाली काढावे, पॉलीसीला त्वरीत मंजूरी द्यावी, बॅकलोन घेणाºयांना कंफर्ट लेटर देण्यात यावे़, बोर्ड आॅफ डायरेक्टरच्या पदे तत्काळ भरण्यात यावे अया विविध मागण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे़
या संपात बीएसएनएल ई़यु़एऩएफ़टी़ई यांच्यासह विविध संघटना झाले असुन धुळे-नंदूरबार जिल्ह्यात सुमारे ४२५ कर्मचारी संपूर्ण देशात सुमारे २० लाख कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याचे निवेदनात ्म्हटले आहे़
निवेदनावर संजय नागणे, रतन मराठे, रोहीदास भामरे, राजू शेख, राजेंद्र चांदोडे, ए़ ए़ शिंदे, एम़ए़माळी, किरण भामरे, टी़ आऱ पाटील, सुनिल पाटील, पी़ एम़ पाटील, किशोर वाघ, आऱएम़पाटील, नंदलाल तिवारी, सुनिता कुलकर्णी, वर्षा पाठक, श्रीमती बने आदींच्या स्वाक्षºया आहेत़

Web Title: Fill vacant posts of BSNL Company immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे