Feelings expressed by Chucklet | प्रेयसिला चॉकेलट देत व्यक्त केल्या मनतील भावना
प्रेयसिला चॉकेलट देत व्यक्त केल्या मनतील भावना

ठळक मुद्देआज टेडी डे; बाजारात खरेदीसाठी लगबग‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अनेक तरूण-तरूणी खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना दिसत आहे. शुक्रवारी चॉकलेट डे निमित्त शहरातील झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, जयहिंद ज्युनियर कॉलेज, एस. एस. व्ही. पी. एस महाविद्यालयाजवळ चॉकलेट विक्रेत्यांनी दुकाने थाटली हदरम्यान, शनिवारी ‘टेडी डे’ आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला शहरातील फुलवाला चौकात थाटलेल्या दुकानांवर खरेदीसाठी तरुण-तरुणींची प्रचंड गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बुधवारपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ला सुरूवात झाली़ शुक्रवारी चॉकलेट डे निमित्त तरुणांनी त्यांच्या प्रेयसिला चॉकलेट देत मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. 
शहरात सध्या ‘व्हॅलेंटाईन वीक’ निमित्त सर्वच महाविद्यालयांमध्ये धामधूम दिसत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून प्रेयसिला आपलेसे करण्यासाठी तरुणाई नानाविध फंडे वापरताना दिसत आहे. शुक्रवारी चॉकलेट डे निमित्त प्रेमविरांनी त्यांच्या प्रेयसिला आकर्षित करण्यासाठी चॉकलेट दिल्याचे दिसून आले. 


Web Title: Feelings expressed by Chucklet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.