कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:42 PM2018-02-16T17:42:52+5:302018-02-16T17:44:34+5:30

कृषि यांत्रिकीकरण दिवस : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Extensive changes in the agricultural sector need to be changed | कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे गरजेचे

कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल होणे गरजेचे

Next
ठळक मुद्दे विविध अवजारांचे भरविण्यात आले प्रदर्शननवीन अवजारे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कारजिल्ह्यातील शेतकºयांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : भारत हा कृषिप्रधान देश असून, नवीन भारत घडवायचा असेल तर कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात यंत्राचे महत्व वाढलेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवीदिल्ली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, कृषी विज्ञान केंद्र धुळे,कृषी विभाग धुळे, महाराष्टÑ कृषी अवजारे उत्पादक संघटना धुळे व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण दिवस व सुधारित कृषी अवजाराचे प्रदर्शनाच्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक डॉ. शरद गडाख होते. व्यासपीठावर ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. बबनराव पाटील, नंदुरबारचे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. प्रकाश तुरबतमठ, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, प्रा. तुळशीदास बास्टेवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते. रावल म्हणाले एकीकडे देशात बेरोजगारी वाढते आहे, तर दुसरीकडे शेतात मजुर मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे मजुरांवर अवलंबून न राहता शेतकºयांनी यांत्रिकीकरणाकडे वळले पाहिजे. शेतकºयांनीही शेतीत झालेले बदल अंगिकारले पाहिजे. डॉ. शरद गडाख म्हणाले की, जिरायत व बागायती शेती करणाºया शेतकºयाला भरीव उत्पन्न मिळावे यासाठी विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. डॉ. अशोक मुसमाडे यांनी यांत्रिकीकरणामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते असे सांगितले. यावेळी शेतीला उपयुक्त नवनवीन यंत्रे तयार करणाºया शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. तुळशीदास बास्टेवाड यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश काथापुरे यांनी केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

.

 

Web Title: Extensive changes in the agricultural sector need to be changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.