साक्रीत माजी सैनिकाकडे चोरी पिस्तुल,दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:17 PM2018-01-15T12:17:50+5:302018-01-15T12:18:39+5:30

साक्रीतील घटना : पोलिसात गुन्ह्याची नोंद

Ex-servicemen of the deceased, theft pistols, jewelery lumpas | साक्रीत माजी सैनिकाकडे चोरी पिस्तुल,दागिने लंपास

साक्रीत माजी सैनिकाकडे चोरी पिस्तुल,दागिने लंपास

Next
ठळक मुद्देसाक्रीत दोन ठिकाणी शनिवारी रात्री धाडसी घरफोडीधुळे येथून श्वान पथक मागविले घटनेमुळे साक्री शहरात भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : शहरातील दोन ठिकाणी शनिवारी रात्री धाडसी घरफोडीची घटना घडली़ यातील एका घरातून ६६ हजार रुपये किंमतीचे दागिने तर दुसºया   सेवानिवृत्त सैनिकाच्या घरातून पिस्तूल लंपास झाली़ याप्रकरणी गुन्हा दाखल झाला़
साक्री नवापूर रस्त्यावरील सरस्वती कॉलनीमध्ये प्राथमिक शिक्षक योगेश्वर काशिनाथ निकवाडे यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने, सेट बॉक्स असा ६६ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़ तर एक लॅपटॉप चोरट्यांनी फोडून बाहेर फेकून दिल्याचे आढळून आले आहे़ 
दुसºया घटनेत पेरेजपूर रस्त्यावरील सप्तश्रृंगी कॉलनीतील सेवानिवृत्त सैनिक संजय भाईदास बोरसे यांचेही बंद घर फोडून घरातील २० हजार रुपये किंमतीची पिस्तूल चोरुन नेली आहे़ 
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शेजाºयांनी साक्री पोलिसांना कळविले़ धुळे येथून श्वान पथक मागविले असता त्याने महामार्गापर्यंत रस्ता दाखविला़ तेथून चोरटे एखाद्या वाहनाने पसार झाले असावेत, असा अंदाज आहे़
सरस्वती कॉलनीमधील योगेश्वर निकवाडे यांच्या घरात चोरी झाली तेव्हा त्यांच्या घराच्या वरती जे भाडेकरु राहतात त्यांच्याच भावाकडे सप्तश्रृंगी कॉलनीत चोरी झाली, हे विशेष़ या दोनही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे़ तपास कामाला सुरुवात देखिल केली आहे़ 

Web Title: Ex-servicemen of the deceased, theft pistols, jewelery lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.