धुळे येथे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 06:22 PM2019-02-08T18:22:08+5:302019-02-08T18:25:37+5:30

विविध स्पर्धेतील विजेत्यांचा झाला गौरव

The district-level Chacha Nehru Balamohotsav concludes at Dhule | धुळे येथे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

धुळे येथे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचा समारोप

Next
ठळक मुद्देतीन दिवसांपासून सुरू होता बालमहोत्सवजिल्ह्यातील जवळपास ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग विजेत्यांना दिली बक्षीसे

आॅनलाइन लोकमत
धुळे :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे  आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा शुक्रवारी थाटात समारोप झाला.त्यात वैयक्तिक नृत्य,  फॅन्सी ड्रेस स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे आदीती मासुळे, छाया पाटील, प्रफुल्ल माळी, पूनम देवरे, मोइन शेख, रेखा घोडके  यांनी प्रथम क्रमांक पटकावला.  मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करून सर्व विजेत्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित दुसाने होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी.एन. शिंपी, डॉ. वनिता सोनजे,  बाल न्याय मंडळाचे सदस्य यशवंत हरणे, अ‍ॅड. अनिता भांबेरे,बाल कल्याण समिती सदस्य प्रा. सुदाम राठोड, प्रा.वैशाली पाटील, सुनील वाघ उपस्थित होते. 
महोत्सवाचे हे सहावे वर्ष होते. यात जिल्ह्यातील चार बालगृह तसेच शहरातील इतर शाळांमधील ३०० ते ४०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.
 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य, सांघिक नृत्य, चित्रकला स्पर्धा या शिवाय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतून दोन विजेते निवडण्यात आले.
वयोगटनिहाय स्पर्धा व त्यातील अनुक्रमे प्रथम, द्वितीय विजेते असे- फॅन्सी ड्रेस (६ ते १२) मुले-प्रफुल्ल तोताराम माळी, रोहीत भटू देसले. मुली- पूनम रत्नाकर देवरे, दामिनी सुरेश गवळे. वयोगट १२ ते १५ (मुली)- छाया इश्वर पाटील, उज्वला नथ्थु पवार. वैय्यक्तिक नृत्य (वयोगट ६ ते १२) मुली- भारती मासुळे, जयश्री बागले (विभागून), पूनम देवरे. १२ ते १५ वयोगट-  छाया ईश्वर पाटील, उज्वला नथ्थु पवार. सांघिक नृत्य (वयोगट ६ ते १८)  प्रथम-मुलींचे निरीक्षण गृह, बालगृह. 
चित्रकला स्पर्धा-लहानगट (मुले) -शेख सैफ मोईन, गिरीश पांगा पावरा. मुली-रेखा गोविंदा घोडके, जागृती पंढरीनाथ पाटील. मोठा गट (मुले)-अशोक पावरा, राकेश पावरा. मोठा गट मुली-अनिता नाथाभाऊ पाटील, शितल नाना सदक.
बुद्धीबळ  (वयोगट ६ ते १८) मुले-सैफ शेख, हर्षल पावरा. 
यावेळी बोलतांना अ‍ॅड. अमित दुसाने म्हणाले. देशाचे भविष्य  हे उज्ज्वल  करायचे  असेल  तर  समाजाने   बालकांचे योग्य  प्रकारे  संगोपन, काळजी,  संरक्षण  केले  पाहिजे.  त्यासाठी सर्वांनी  कटीबध्द रहावे.
सूत्रसंचालन एम.एम. बागूल यांनी तर आभार वनिता सोनगत यांनी मानले. 
 

Web Title: The district-level Chacha Nehru Balamohotsav concludes at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे