राज्यस्तरीय शंभू पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:34 AM2019-05-18T11:34:04+5:302019-05-18T11:36:31+5:30

सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Distribution of state-level Shambhu Award | राज्यस्तरीय शंभू पुरस्काराचे वितरण

dhule

Next
ठळक मुद्दे  सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, वैद्यकीय,  उद्योजक, पर्यावरण, कृषी, कला क्षेत्रातील एकूण ४५  मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले


धुळे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून  छत्रपती युवा क्रीडा मंडळ महाराष्ट्र राज्य व शाओलीन कुंग फु इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानाने  राज्यस्तरीय शंभू पुरस्कारांचे गुरूवारी रात्री थाटात वितरण करण्यात आले. 
 कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय खो खो संघाचे माजी  कर्णधार  आनंद पवार  होते.  प्रमुख पाहूणे म्हणून फफुटा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण काटे, लेखक हरी महाजन,  गायक पी.गणेश, अभिनेते  गणेश खाडे, अभिनेत्री अपूर्वा शेलगावकर, व्ही. सुरेंद्रन, आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे , सचिव प्रसाद पाटील , मनोज रुईकर, हेमंत भडक, अनिल पाटील आदी उपस्थित होते. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष होते.   
यावेळी   सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, वैद्यकीय,  उद्योजक, पर्यावरण, कृषी, कला क्षेत्रातील एकूण ४५  मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आयोजन समिती अध्यक्ष विकास मराठे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  संदेश दाभाडे, मंगेश पाटील, प्रमोद पाटील, दिग्विजय पाटील, ऋषीं दाभाडे, कुणाल चौधरी, शुभम शिंदे, पंकज पाटील, राजेंद्र देवरे, पवन सोनार आदींनी परिश्रम  घेतले. 
 प्रास्ताविक  विकास मराठे यांनी  केले सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले.  या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त विजेते असे
जितेंद्र देसले, यशवंत गोसावी, मनीषा माळी,  शिवमती किरण नवले, प्रवीण महाजन, अनिल मराठे, योगेश पाटील, विनायक खोत, प्रज्ञा मालपुरे, वैशाली मालपुरे, दीपक पाटील, अतुल दहिवेलकर, अनिल चव्हाण, पवन मराठे, डॉ.योगेश ठाकरे, डॉ. अमित पाटील, कैलास देवरे, पांडुरंग पाटील,  संतोष देवरे, नितीन पाटील, गोकुळ पाटील, डॉ. विजय भोसले, प्रज्ञा पाटील, प्रसाद पाटील, गिरीश दारुंटे, वीरेंद्र मोर, प्रा. रवींद्र निकम,  रामकृष्ण सूर्यवंशी, सरमोड पाटील, स्वप्नील रमेश पाटील, विशाल सूर्यवंशी, प्रवीण बारकू खैरनार यांना पुरस्कार दिला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. . 

 

Web Title: Distribution of state-level Shambhu Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे