धुळ्याच्या पालक मंत्र्यांनी एका दिवसात केली दुष्काळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 06:03 PM2018-10-16T18:03:18+5:302018-10-16T18:04:59+5:30

शेतकºयांनी मांडल्या व्यथा, दुष्काळाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार

Dhule's guardian minister surveyed drought in one day | धुळ्याच्या पालक मंत्र्यांनी एका दिवसात केली दुष्काळाची पाहणी

धुळ्याच्या पालक मंत्र्यांनी एका दिवसात केली दुष्काळाची पाहणी

Next
ठळक मुद्दे पालकमंत्र्यांनी धुळे, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात केली पाहणीपालकमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकारीही उपस्थितपाहणी दौºयाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार


आॅनलाइन लोकमत
धुळे :   जिल्ह्यातील धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा या तीन तालुक्यातील दुष्काळाची  जिल्हा पालक मंत्री दादा भुसे यांनी एका दिवसात पाहणी केली.यावेळी शेतकºयांनी पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. पाहणीनंतर सायंकाळी साडे पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहे.
मंगळवारी सकाळी पालक मंत्री दादा भुसे मालेगावहून धुळ्यात दाखल झाले.  पाहणी दौºयाची सुरुवात त्यांनी धुळे तालुक्यापासून केली. तालुक्यातील आर्वी, नगाव, देवभाने, धमाणे, सरवड गावांची पाहणी केली. त्यानंतर दुपारी शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील गावांची पाहणी केली.   
पीक पाहणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांचे सोबत जिल्हाधिकारी राहूल रेखाराव, कृषी अधिकारी पी.ए. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनावणे, माजी आमदार प्रा.शरद पाटील उपस्थित होते. 
आपल्या दुष्काळ पाहणी दौºयाचा अहवाल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहोत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली जे निकष आहेत. पाऊस कमी पडला,  किती पडला यानुसार व काही अनुमान सॅटेलाईट मार्फत घेतले जातात या आधारे दुष्काळ जाहीर केला जातो. बहुदा या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री दुष्काळ बाबत घोषणा करतील व त्यानुसार शेतकºयांना सवलती दिल्या जातीलअसे भुसे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 


 

Web Title: Dhule's guardian minister surveyed drought in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे