धुळे एस.टी. विभागात कर्मचारी संघटनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:47 PM2018-02-16T17:47:02+5:302018-02-16T17:48:46+5:30

कामगार करार त्वरीत करण्याची केली मागणी

Dhule ST Dhol Bajao Movement by the Employees Association in the division | धुळे एस.टी. विभागात कर्मचारी संघटनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन

धुळे एस.टी. विभागात कर्मचारी संघटनेतर्फे ढोल बजाओ आंदोलन

Next
ठळक मुद्देदोन वर्षांपासून कामगार कराराची मुदत संपलीकामगार करात त्वरीत होण्याची मागणीमहामंडळाचे खाजगीकरण करू नये

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रखडलेला कामगार करार त्वरीत करण्यात यावा या मागणीसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेतर्फे आज धुळे विभागीय कार्यालयासमोर दुपारी ‘ढोल बजाओ, शासन जगाओ’ आंदोलन करण्यात आले आहे. 
एस.टी. महामंडळात कामगार कराराची मुदत संपून जवळपास दोन वर्षे झाली. तरीही अद्याप कामगार करार झालेला नाही. एस.टी. महामंडळाच्या कर्मचाºयाला शासन व प्रशासनाने वाºयावर सोडलेले आहे.एस.टी. कर्मचारी अतिशय तुटपुंज्या पगारात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे. शासनाला व प्रशासनाला जाग येण्यासाठी कामगार संघटनेतर्फे दुपारी भोजनाच्या सुटीत धुळे विभागीय कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ, शासन जगाओ’ आंदोलन करण्यात आले. कामगार करार त्वरीत व्हावा, एस.टी. महामंडळाचे खाजगीकरण करू नये, पदोन्नतीत आरक्षणाप्रमाणे बढत्या मिळाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. 
यावेळी विभागीय अध्यक्ष नितीन वाघ, कार्यकारी सरचिटणीस वाल्मिक येलेकर, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 



 

Web Title: Dhule ST Dhol Bajao Movement by the Employees Association in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.