धुळे विभागातून पंढरपुरसाठी ३०० जादा बस सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:42 PM2018-07-15T12:42:12+5:302018-07-15T12:43:28+5:30

आषाढीचे नियोजन, विभागाला एक कोटी उत्पन्न अपेक्षित

From Dhule section, 300 additional buses to Pandharpur will be left | धुळे विभागातून पंढरपुरसाठी ३०० जादा बस सोडणार

धुळे विभागातून पंढरपुरसाठी ३०० जादा बस सोडणार

Next
ठळक मुद्देआषाढीसाठी १८ जुलैपासून जादा बसेस सोडणारधुळे विभागाला एक कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षितप्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन

आॅनलाइन लोकमत
धुळे :  आषाढीवारीसाठी पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या प्रचंड आहे. या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातर्फे ३०० बसगाड्या जादा सोडण्यात येणार आहेत. या जादा बस गाड्यांच्या फेºयामधून धुळे विभागाला १ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.   
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा भरत असते. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातून हजारो भाविक ‘पांडुरंगा’च्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी महामंडळातर्फे जादा बस गाड्यांचे नियोजन करण्यात  आले आहे. १८ ते २२ जुलै असे पाच दिवस  धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोंडाईचा या आगारातून बसगाड्या सोडण्यात येतील.
धुळे विभागातर्फे नगर विभागालाही बसेस पुरविण्यात येत असतात.  यावर्षी नगरला ८५ बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या फेºयासहीत जवळपास ३०० जादा बस सोडण्यात येतील.
या फेºयांमधून किमान ५० हजार भाविक या बससेवेचा लाभ घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे या जादा फेºयांमधून धुळे विभागाला एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न अपेक्षित आहे.गेल्यावर्षी आषाढी निमित्त धुळे विभागातर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने  पंढरपुरसाठी  २६० फेºया करण्यात आल्या होत्या.  यातून विभागाला ७९ लाख ३० हजार ९४५ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. 



 

Web Title: From Dhule section, 300 additional buses to Pandharpur will be left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे