धुळे- ऐंशी फुटी रोडवरील भंगार गोडाऊन व घराला आग, एक लाखाचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:02 AM2018-02-20T10:02:51+5:302018-02-20T10:03:00+5:30

ऐंशी फुटी रोड नटराज जवळील पहाटे अचानक भंगार गोडावून व घराला आग लागली.

Dhule - Scrap Godown and a house fire on eighty foot road, one lakh damages | धुळे- ऐंशी फुटी रोडवरील भंगार गोडाऊन व घराला आग, एक लाखाचं नुकसान

धुळे- ऐंशी फुटी रोडवरील भंगार गोडाऊन व घराला आग, एक लाखाचं नुकसान

Next

धुळे - ऐंशी फुटी रोड नटराज जवळील पहाटे अचानक भंगार गोडावून व घराला आग लागली. आगीत अशपाक अन्सारी यांचं गोडावूनचे एक लाखाचे नुकसान आहे. गोडावूनमधील रद्दी पेपर,प्लास्टिक डबे,लाकडी, पत्रे आगीत राख झाले. रद्दी पेपर व जुने लाकूड यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. तीने चार फुट उंच आगीचे,धुराचे लोळ परिसरात होते. जवळ असलेल्या संतोष मल्हार यांच्या घरालाही या आगीची झळ बसली.  आगीत घरातील साहित्य व चाळीस हजार रुपये जळालं आहे.  सकाळी दूध टाकायला येणारा व्यक्ती घटनास्थळी आला तेव्हा लागली होती.   या दूध टाकणाऱ्या व्यक्तीने आग लागल्याचं सगळ्यांना सांगितलं.  

या घटनेची माहिती अग्निशमक दलाला दिल्यानंतर दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या दोन फेऱ्या होऊन आगीवर नियंञण मिळाले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही. 

Web Title: Dhule - Scrap Godown and a house fire on eighty foot road, one lakh damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.