धुळे महापालिकेच्या करवसुली पथकाला मोगलाईत दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:11 PM2018-02-18T12:11:09+5:302018-02-18T12:12:17+5:30

थकबाकी वसुलीवरून वाद, पोलिसात तक्रार नाही

Dhule Municipal Corporation's tax evacuation mogulite box office | धुळे महापालिकेच्या करवसुली पथकाला मोगलाईत दमदाटी

धुळे महापालिकेच्या करवसुली पथकाला मोगलाईत दमदाटी

Next
ठळक मुद्दे-दोन लाख थकबाकीच्या करवसुलीवरून मोगलाईत वाद-मनपा प्रशासनाकडून सामोपचाराची भुमिका, गुन्हा दाखल नाही-मनपा पथकाकडून करवसुलीसाठी एक दुकान ‘सील’

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेचे करवसुली पथक शनिवारी साक्री रोडवरील मोगलाई भागात थकबाकीदार मालमत्ताधारकांकडे करवसुलीसाठी गेले असता पथकाला दमदाटी झाल्याची घटना घडली़ मात्र मनपा प्रशासनाने पोलिसात गुन्हा दाखल न करता सामोपचाराची भुमिका घेतली़
महापालिकेतर्फे सध्या मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर करवसुलीची धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार शनिवारी मोगलाई भागातील एका थकबाकीदाराकडे २ लाख २५ हजार रूपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी मनपा करवसुली विभागाचे सहायक आयुक्त अभिजीत कदम व पथक गेले होते़ त्यावेळी संबंधित मालमत्ताधारकाचे नळ कनेक्शन तोडण्यासह जप्तीच्या कार्यवाही करण्यावरून पथक व मालमत्ताधारकामध्ये वाद झाला़ त्यावेळी सहायक आयुक्त अभिजीत कदम यांना दमदाटी करण्यात आली़ त्यानंतर मनपा पथकाने शहर पोलिस ठाणे गाठले होते़ परंतु आयुक्तांनी गुन्हा दाखल न करता परतण्याचे आदेश दिल्याने पथकानेही काढता पाय घेतला़ दरम्यान, मोगलाई भागातच अन्यत्र एका मालमत्ताधारकाचे दुकान सील करण्यात आले़ त्यावेळी देखील किरकोळ वाद झाला़ मनपा पथकात सहायक आयुक्त अभिजीत कदम, बळवंत रनाळकर, मधुकर निकुंभे, प्रसाद जाधव, किशोर शिंदे, अनिल जोशी, दिलीप मुसळे यांचा समावेश होता़


 

Web Title: Dhule Municipal Corporation's tax evacuation mogulite box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.