धुळे जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:39 AM2018-01-19T11:39:37+5:302018-01-19T11:40:42+5:30

निवडणूक शाखा : विधानसभा मतदार संघाची यादी अद्ययावत; १५ लाख ६७ हजार १९१ मतदार संख्या 

In Dhule district, 934 women voters are behind 1,000 men | धुळे जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया मतदार

धुळे जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे ९३४ स्त्रिया मतदार

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात मतदारांची नव्याने नोंदणी,  धुळे शहर विधानसभा मतदारसंघात स्त्री मतदारांची संख्या कमी जिल्ह्यात मतदारांची संख्या  १५ लाख ६७ हजार १९१

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाची यादी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे अद्ययावत करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही ९३४ इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधानसभा मतदार यादीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात मतदारांची संख्या आता १५ लाख ६७ हजार १९१ इतकी झाली आहे. 
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदारांची नव्याने नोंदणी, तसेच दुबार, मयत व स्थलांतरित नावांची वगळणीची मोहीम जिल्ह्यात बीएलओंमार्फत राबविण्यात आली. १ जानेवारी २०१७ पर्यंत जिल्ह्यात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांसचे प्रमाण हे ९३१ इतके होते. त्यात १ जानेवारी २०१८ पर्यंत या प्रमाणात तीन स्त्री मतदारांची संख्या वाढ झाली आहे. 
धुळे शहर मतदारसंघात 
स्त्री मतदारांचे प्रमाण कमी 
जिल्ह्यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघात स्त्री मतदारांची संख्या कमी असल्याची बाब दिसून आली आहे. धुळे शहर मतदारसंघात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या ही केवळ ८८७ इतकी आहे. तर उर्वरित धुळे ग्रामीण मतदारसंघात एक हजार पुरुषांमागे स्त्री मतदारांची संख्या  ही ९१७, साक्री ९३६, शिंदखेडा ९३६, शिरपूर ९६४ इतके स्त्री मतदारांचे प्रमाण आहे. 
तीन नवीन मतदान केंद्रांना मान्यता 
जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघासाठी १,६३० मतदान केंद्रांची संख्या होती. त्यात निवडणूक आयोगाने धुळे शहर मतदारसंघासाठी आझाद नगर, मिल्लत नगर व चितोड रोड परिसरात अशा तीन नवीन मतदान केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यामुळे आता  धुळे शहरात २३९ मतदान केंद्रे झाली आहेत.
 तर साक्री ३६५, धुळे ग्रामीण ३७०, शिंदखेडा ३३५ व शिरपूर तालुक्यात ३२१ मतदान केंद्रे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
फोटे अपडेटचे चार टक्के काम प्रलंबित 
निवडणूक शाखेतर्फे मतदार नोंदणी अभियान राबविताना मतदार यादीत फोटो अपडेटचे कामही प्राधान्याने करण्यात आली. हे काम ९६.९४ टक्के इतके झाले आहे. अद्याप चार टक्के काम प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या अद्ययावत झालेल्या मतदार यादीत एकूण मतदारांची संख्या ही १५ लाख ६७ हजार हजार १९१ आहे. पैकी १५ लाख १७ हजार ५४४ मतदारांचे फोटो यादीत असून उर्वरित मतदारांचे फोटो यादीत नाहीत. 
नाव नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरूच राहणार 
दरम्यान, विधानसभा मतदारसंघाची यादी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी नव्याने नाव नोंदणीची निरंतर प्रक्रिया ही सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. तसेच २५ जानेवारीला राष्टÑीय मतदार दिवसानिमित्त नव्याने नोंदणी करणाºया मतदारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्मार्ट मतदार ओळखपत्राचे वितरण केले जाणार आहे. 
 ज्या मतदारांनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदणी करून घेतलेली नाही, त्यांनी निरंतर प्रक्रियेंतर्गत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

 

Web Title: In Dhule district, 934 women voters are behind 1,000 men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.