In Dhule district, 55 thousand students are admitted for Class X and XII | धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५५ हजार विद्यार्थी प्रविष्ट
धुळे जिल्ह्यात दहावी, बारावीसाठी ५५ हजार विद्यार्थी प्रविष्ट

ठळक मुद्देबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत होणारदहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधित होणारपाच भरारी पथकांची नियुक्ती

आॅनलाइन लोकमत
धुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये घेण्यात
येणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. इयत्ता बारावीसाठी २५ हजार ३५७ तर इयत्ता दहावीसाठी २९ हजार ७१५ विद्यार्थी असे दोन्ही परीक्षा मिळून ५५ हजार ७२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी १ हजार २९१ विद्यार्थी कमी आहेत.
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधित होणार आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
बारावीसाठी ४४ केंद्र
जिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये ७, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात ९, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी ७-७ अशा एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
दहावीसाठी ६३ केंद्र
दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये १३, धुळे ग्रामीणमध्ये १७, साक्री तालुक्यात १३, शिरपूर तालुक्यात ९, व शिंदखेडा तालुक्यात ११ अशा एकूण ६३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
५५ हजार ७२ विद्यार्थी परीक्षा देणार
बारावीची परीक्षा २५ हजार ३५७ तर दहावीची परीक्षा २९ हजार ७१५ असे एकूण ५५ हजार ७२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत.
दरम्यान गेल्यावर्षी बारावीसाठी २५ हजार ८८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर दहावीसाठी ३० हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या दोन्ही परीक्षा मिळून यावर्षी १ हजार २९१ विद्यार्थी कमी झालेले आहेत.
पाच भरारी पथकांची नियुक्ती
परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळातर्फे पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायटच्या प्राचार्या तसेच डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या यांचा समावेश आहे.
आठ ठिकाणी कस्टडी
प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकूण आठ कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर व ग्रामीणसाठी ३ कस्टडी, साक्री तालुक्यासाठी दोन कस्टडी, शिरपूर तालुक्यासाठी एक कस्टडी, शिंदखेडा तालुक्यासाठी २ कस्टडींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा पार पडण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.


Web Title:  In Dhule district, 55 thousand students are admitted for Class X and XII
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.