धुळे शहर पोलिसांनी एकास कारसह केली अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:33 PM2018-05-21T16:33:24+5:302018-05-21T16:33:24+5:30

१० लाखांची लूट प्रकरण : मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी असल्याची माहिती 

Dhule city police arrested with single car | धुळे शहर पोलिसांनी एकास कारसह केली अटक 

धुळे शहर पोलिसांनी एकास कारसह केली अटक 

Next
ठळक मुद्देकुरियर कंपनीच्या कर्मचा-याकडून लुटले होते १० लाख रूपयेधुळे मध्यवर्ती बसस्थानकातील गेल्या बुधवारची घटना कारसह एकास अटक, मुंबई पोलीस कर्मचारी असल्याची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील मध्यवर्ती बसस्थानकात कुरियर कंपनीच्या कर्मचाºयाकडून १० लाख रुपये लुटल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास कारसह अटक केली असून तो मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली. 
कर्मचाºयांना लुटीची ही घटना गेल्या बुधवारी घडली होती. या प्रकरणी शनिवारी रात्री अज्ञात लुटारूंविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
गुन्ह्याच्या तपासार्थ पोलिसांनी तपास चक्रे फिरवून एकास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी क्र.एमएम ०२ एयू ९४८० या क्रमांकाची कारही त्याच्याकडून ताब्यात घेतली आहे. या कर्मचाºयाचे नाव कळू शकलेले नाही. मात्र तो मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पकडलेल्या आरोपीकडून काय माहिती मिळते याकडे आता लक्ष लागले आहे.
अशी घडली होती लुटीची घटना 
अहमदाबाद येथील रामभाई मोहनदास अंगडिया या कुरियर कंपनीच्या जळगाव येथील शाखेत कार्यरत अमरतभाई हिराभाई पटेल  प्रकाशभाई दायाबाई पटेल हे बुधवारी पहाटे जळगाव येथून सुरतला जाण्यासाठी निघाले. जळगावच्या शाखेत जमा केलेले १० लाख रूपये व्यवस्थापक संजयभाई प्रजापती यांनी अमरतभाई याच्याकडे दिले.जळगाव-नंदुरबार बसने ते दोघे येथील मध्यवर्ती बसस्थानकात उतरले. याचवेळी खाकी रंगाचा शर्ट, पॅँट घातलेले दोघे जण तेथे आले. तसेच त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून अमरतभाई  यास ताब्यात घेतले. यावेळी प्रकाशभाई याने पळ काढला. त्या नंतर बसस्थानकाबाहेर उभ्या कारमध्ये डांबून तिसगाव ढंढाणे गावाकडे नेले. अमरतभाई यास हवाल्याच्या पैशांचा व्यवहार करतो असे सांगून शिवीगाळ, दमदाटी करत १० लाखाची लूट केली होती. 

 

Web Title: Dhule city police arrested with single car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.