धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:18 PM2018-11-01T17:18:51+5:302018-11-01T17:20:05+5:30

धुळे, अहमदनगर महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे.

Dhule and Ahmadnagar municipal elections declared on 9 December | धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान

धुळे व अहमदनगर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; 9 डिसेंबरला मतदान

Next

मुंबई : धुळेअहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल; तर  मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.


 सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.


 अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


    दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.


निवडणूक कार्यक्रम
•    नामनिर्देशनपत्रे दाखल करणे        : 13 ते 20 नोव्हेंबर 2018
•    नामनिर्देशनपत्रांची छाननी            : 22 नोव्हेंबर 2018
•    उमेदवारी मागे घेणे                      : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत
•    निवडणूक‍ चिन्ह वाटप                 : 27 नोव्हेंबर 2018
•    मतदान                                       : 9 डिसेंबर 2018
•    मतमोजणी                                  : 10 डिसेंबर 2018
•    निकालाची राजपत्रात प्रसिद्धी      : 13 डिसेंबर 2018 पर्यंत

 

Web Title: Dhule and Ahmadnagar municipal elections declared on 9 December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.