धुळे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम अवघे २० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:16 PM2019-04-25T14:16:37+5:302019-04-25T14:18:34+5:30

रेती, पाण्यामुळे बांधकामावर होतोय परिणाम

The construction of toilets in Dhule district is only about 20 percent | धुळे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम अवघे २० टक्केच

धुळे जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम अवघे २० टक्केच

Next
ठळक मुद्दे२०१२-१३ मध्ये जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ८६९ कुटुंबाचा सर्वे करण्यात आलामार्च २०१८ मध्ये धुळे जिल्हा प्रशासनाच्यादृष्टीने हगणदारीमुक्त झाला.२०१९-२० या वर्षासाठी १४ हजार ५८ वैयक्तीक शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट

आॅनलाइन लोकमत
धुळे : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१८-१९ या आर्थिक वर्षात १७ हजार ५२२ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी अवघ्या ३ हजार ४६४ जणांनीच शौचालय बांधले असून, त्याची टक्केवारी अवघी १९.७६ टक्केच असल्याचे या विभागाच्या संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. दरम्यान २०१९-२० या वर्षासाठी आता १४ हजार ५८ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
२०१२-१३ मध्ये जिल्ह्यात २ लाख ६२ हजार ८६९ कुटुंबाचा सर्वे करण्यात आला होता. त्यात फक्त ५२ हजार ५२४ जणांकडे वैयक्तिक शौचालये असल्याची बाब समोर आली होती. यात सर्वाधिक वैयक्तिक शौचालये बांधकाम धुळे तालुक्यात झालेले होते. या तालुक्यात १८ हजार ५६६ जणांनी शौचालये बांधलेले आढळले. त्याखालोखाल साक्री तालुक्यात १४ हजार ७१०, शिरपूर तालुक्यात १० हजार ५१६ तर सर्वात कमी शिंदखेडा तालुक्यात ८ हजार ७५८ वैय्यक्तीक शौचालये बांधलेले होते.
२०१३-१४ पासून ही योजना जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात झालेली आहे. पहिल्यावर्षी जिल्ह्यात ९४२ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. यात धुळे, साक्री, शिरपूर तालुक्यात प्रतिसाद चांगला असतांना शिंदखेडा तालुक्यात अवघे एक वैयक्तिक शौचालये बांधण्यात आले होते.
२०१४-१५ यावर्षात मात्र या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला. या वर्षात ८५२२ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यात धुळे तालुक्यात २४०६, साक्री तालुक्यात २३३७, शिंदखेडा तालुक्यात १७०१ तर शिरपूर तालुक्यात २०७८ शौचालये बांधण्यात आले.
१५-१६ या वर्षात हीच संख्या २८४२४ पर्यंत गेली. तर १६-१७ मध्ये ५० हजार ३३ शौचालयांचे बांधकाम झाले.
जि.प. प्रशासनाला २०१७-१८ या वर्षात १ लाख ०४ हजार ८८२ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. यापैकी १७ हजार ५२२ कुटुंबाकडे वैय्यक्तीक शौचालये नव्हते. मात्र ते सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत असल्याचे आढळून आले. मार्च २०१८ मध्ये धुळे जिल्हा प्रशासनाच्यादृष्टीने हगणदारीमुक्त झाला.
दरम्यान २०१८-१९ या वर्षासाठी जिलाला १७ हजार ५२२ वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यापैकी फक्त ३ हजार ४६४ वैयक्तीक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्याची टक्केवारी अवघी १९.७६ टक्के एवढी आहे. आता २०१९-२० या वर्षासाठी १४ हजार ५८ वैयक्तीक शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: The construction of toilets in Dhule district is only about 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे