धुळे तालुक्यातील विद्यार्थिनींची मोफत पास मिळत नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:20 PM2018-08-13T15:20:54+5:302018-08-13T15:22:18+5:30

जिल्हाधिकाºयांची घेतली भेट, विद्यार्थिनींनी मांडली कैफियत

Complaint does not get free passes for girls from Dhule taluka | धुळे तालुक्यातील विद्यार्थिनींची मोफत पास मिळत नसल्याची तक्रार

धुळे तालुक्यातील विद्यार्थिनींची मोफत पास मिळत नसल्याची तक्रार

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून पास मिळत नसल्याची तक्राररोज पैसे खर्च करून शहरात येणे अवघडजिल्हाधिकाºयांनी समजून घेतली समस्या

आॅनलाइन लोकमत
धुळे : ग्रामीण भागातून शहरात शिक्षणाला येणाºया विद्यार्थिनींना धुळे आगारातर्फे गेल्या दोन महिन्यांपासून मोफत पास दिले जात नसल्याची कैफियत विद्यार्थिनींनी आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासमोर मांडली. जिल्हाधिकाºयांनीही प्रत्येक विद्यार्थिनीची समस्या ऐकून घेतली. 
 दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी शहरात येत असतात. शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाºया आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मानव विकास योजनेंतर्गत तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर  योजनेंतर्गत मोफत पास दिला जातो. 
असे असले तरी धुळे आगारातर्फे पास देतांना आडमुठे धोरण अवलंबिले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना मोफत पास देण्यात आलेले नाहीत.  या संदर्भात शाळेच्या शिक्षकांनी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, धुळे आगार प्रमुख भगवान जगनोर यांच्याशी वारंवार संपर्क साधला, प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र त्यांनी दाद दिली नाही. 
त्यामुळे जवळपास ९२ विद्यार्थिनींनी आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी मोजक्या लोकांना भेटतात, त्यांचे निवेदन स्वीकारतात. मात्र जिल्हाधिकाºयांनी आज सर्व विद्यार्थिनींना आपल्या दालनात प्रवेश दिला. जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक विद्यार्थिनी कोणत्या गावाहून येते, तिची समस्या काय आहे हे जाणून घेतले. या विद्यार्थिनींनी मोफत  पासची कैफियत जिल्हाधिकाºयांसमोर मांडली.
या विद्यार्थिनींसमवेत माजी आमदार शरद पाटील,  प्रा. अरविंद जाधव, प्रा. दर्शना पाठक, प्रा. दिपाली दाभाडे उपस्थित होत्या. 



 

Web Title: Complaint does not get free passes for girls from Dhule taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे