धुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकाºयांनी राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:37 PM2018-09-19T16:37:56+5:302018-09-19T16:39:27+5:30

दोन तासात परिसर केला चकाचक, कर्मचाºयांना दिली स्वच्छतेची शपथ

A cleanliness campaign organized by the officer, officer in Dhule Zilla Parishad | धुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकाºयांनी राबविली स्वच्छता मोहीम

धुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, पदाधिकाºयांनी राबविली स्वच्छता मोहीम

Next
ठळक मुद्देस्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राबविली मोहीमसर्वच विभागाचे अधिकारी हजरकर्मचाºयांना दिली स्वच्छतेची शपथ

आॅनलाइन लोकमत
धुळे- स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकाºयांनी संयुक्तपणे दोन तास स्वच्छता मोहीम राबविली. यात जिल्हा परिषदेचा परिसर व कार्यालयात स्वछता करण्यात आली. 
सकाळी सव्वा अकरा वाजता या स्वच्छता मोहीमेला सुरवात झाली. सुरवातीच्या एका तासात अधिकारी व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या आवारात स्वच्छता केली. त्यानंतर कर्मचाºयांनी कार्यालयात ही मोहीम राबविली. या दोन तासाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला.  या मोहीमेत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती मधुकर गर्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी.,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.के. वाघ, गटविकास अधिकारी अभिजीत घोरपडे, यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित कर्मचाºयांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.



 

Web Title: A cleanliness campaign organized by the officer, officer in Dhule Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे