ठळक मुद्देस्वस्तिक चौकात आमदार गोटे यांच्या पुतळ्याचे दहनआमदार अनिल गोटे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्यात वादराष्ट्रवादी व लोकसंग्रामतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.१४ : आमदार अनिल गोटे आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्यात रंगलेल्या पत्रकबाजीच्या वादाचे पडसाद धुळे शहरात उमटत आहेत. मंगळवारी सकाळी शहरातील स्वस्तिक चौकात मराठा क्रांती मोर्चा समितीच्यावतीने आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले़
शहरात गेल्या काही दिवसांपासून आमदार अनिल गोटे आणि राष्ट्रवादीचे मनोज मोरे यांच्यातील राजकीय वैमनस्य पत्रक युध्दातून प्रकर्षाने गाजत आहे़ आझादनगर पोलीस ठाण्यात मनोज मोरे यांच्याविरोधात तर धुळे शहर पोलीस ठाण्यात अनिल गोटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे़
त्यानंतर आमदार गोटे यांच्या विरोधात मराठी क्रांती मोर्चाच्यावतीने तर मनोज मोरे यांच्या विरोधात लोकसंग्रामच्यावतीने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना मंगळवारी सकाळी निवेदन देण्यात आले़ यावेळी दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.