धुळ्य़ातील रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:48 PM2017-09-21T12:48:54+5:302017-09-21T12:49:30+5:30

डेंग्यू संशयित रुग्ण : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून येणा:या अहवालाची प्रतीक्षा

Blood samples of stomach patients are sent for inspection | धुळ्य़ातील रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविली

धुळ्य़ातील रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविली

googlenewsNext
ठळक मुद्देफवारणी, धुरळणी सुरूकीटक सव्र्हेक्षण

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 21 - शहरात असलेल्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू आजाराने डोकेवर काढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 50 संशयित रूग्ण आढळले असून, त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून अहवालाची प्रतीक्षा असल्याचे मलेरिया विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा फैलाव झालेला आहे. यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात 95 संशयित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 17 रूग्ण पॉङिाटिव्ह आढळून आले होते. 
ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचे रूग्ण आढळून आले. यात 50 संशयित रूग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यांच्याकडील अहवालाची प्रतीक्षा आहे. 
ज्या भागात डेंग्यूचा पॉङिाटिव्ह रूग्ण आढळला त्या भागात कीटक सर्वेक्षण करण्यात येते. तो कीटक, डास कुठल्या प्रकरचा आहे, याचा शोध घेऊन, त्यानुसार उपाय योजना करण्यात येत आहेत. 
डेंग्यू, मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात कंटेनर सव्र्हे, फरवारणी, धुरळणी केली जात आहे. यासाठी नऊ पथके तयार करण्यात आलेले आहेत. एका पथकात आठ-नऊ कर्मचा:यांचा समावेश आहे.  यातील काही कर्मचारी धुरळणी-फवारणी करतात. 
तर काही कर्मचारी कंटेनर तपासणी करीत असल्याचे सांगण्यात आले. 
सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 50 संशयित रूग्ण आढळले होते. त्यांचे रक्तजल नमुने वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले आहे. त्यांच्याकडून अहवालाची प्रतीक्षा आहे. 
- अपर्णा पाटील, जीवशास्त्रज्ञ,  मलेरिया विभाग, धुळे

Web Title: Blood samples of stomach patients are sent for inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.