Dhule Municipal Election 2018 : पहिल्या दोन तासात सरासरी ५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:46 AM2018-12-09T10:46:05+5:302018-12-09T12:22:14+5:30

धुळे मनपा : आजी माजी लोकप्रतिनिधींनी केले मतदान

Average 5 percent voting in the first two hours | Dhule Municipal Election 2018 : पहिल्या दोन तासात सरासरी ५ टक्के मतदान

Dhule Municipal Election 2018 : पहिल्या दोन तासात सरासरी ५ टक्के मतदान

Next

धुळे : धुळे महापालिका निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे़ कुठे शांततेत तर कुठे गर्दी होण्यास सुरुवात झाली़ पहिल्या दोन तासात सरासरी पाच टक्के मतदान झाले़ 
लोकप्रतिनिधीचे मतदान
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे तसेच त्यांचे चिरंजिव डॉ़ राहुल भामरे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, त्यांचे चिरंजिव यशवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, सुनिल महाले, माजी मंत्री शालिनीताई पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक संजय गुजराथी, आदीसह इतर लोकप्रतिनिधींनी मतदानचा हक्क बजाविला़ इतरांना देखील मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले़ 
मुस्लिम प्रभागात गर्दी
शहरातील मुस्लिम बहुल भागात असलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासुन मतदारांच्या रांगा लागल्या होत्या़ मौलवी गंज, भंगार बाजार, ८० फुटी रोड  परिसरात पोलिसांचे पथक तैनात आहेत 

Web Title: Average 5 percent voting in the first two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.