उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 04:47 PM2017-12-17T16:47:26+5:302017-12-17T16:48:45+5:30

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत मागणी

Answer: Maharashtra should be named after Bahinabai Choudhary | उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव द्यावे

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव द्यावे

Next
ठळक मुद्देबैठकीत राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निषेधविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न दिल्यास आंदोलनाचा इशाराराज्यातील जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विद्यार्थी हाच देशाचा खरा आत्मा असतो.विद्यार्थ्यांची अंगभूत क्षमतांचा विकास करणे हेच विद्यापीठांचे महत्वाचे काम आहे. असे सांगताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  प्रा.सुदर्शन तारख यांनी आज केली.
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची राज्यस्तरीय बैठक धुळ्यात मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झाली. त्यावेळी प्रा.तारख बोलत होते.या बैठकीला राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ओबीसी, अनुसूचित जमात, अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाने त्वरीत द्यावी अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच जळगाव येथे राज्यस्तरीय वीर भगतसिंग विचार साहित्य संमेलन घेण्याची घोषणा केली.
शासनाने राज्यातील १३००  शाळा बंद केल्या. तसेच कंपनीला शाळा चालविण्याची परवानगी दिली त्याचा निषेध करण्यात आला.
उदघाटन समारंभाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुरेखा नांद्रे, सुलभा कुंवर ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सचिव प्रकाशटेमगार, राज्यउपाध्यक्ष जयश्री रणदिवे,श्रद्धा बारुळकर, विभागीय अध्यक्ष तेजस पाटील, प्रवक्ते पंकज रणदिवे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन पंकज पाटील व आभार पंकज रणदिवे यांनी मानले.



 

Web Title: Answer: Maharashtra should be named after Bahinabai Choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.