Anil Bhamre, Dhule's choice for the post of coordinator | धुळ्याचे अनिल भामरे यांची समन्वयकपदी निवड
धुळ्याचे अनिल भामरे यांची समन्वयकपदी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेके्रटरी आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी चल्ला वामसी चांदरेड्डी यांनी डॉ़ अनिल भामरे यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे़ 
५ फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली़ त्यात रेड्डी यांनी प्रदेशाध्यक्ष यांच्या संमत्तीनुसार डी़ जी़ पाटील, डॉ़ अनिल भामरे, डॉ़ हेमलता पाटील, योगेंद्र पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली़ याशिवाय त्यांना विविध कामांची जबाबदारी देखील सोपविण्यात आली़ त्यात डॉ़ अनिल भामरे यांना अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली़ तसेच उत्तर महाराष्ट्रातील युवक काँग्रेस व सेवादल यांच्या कामकाजाची जबाबदारी देखील देण्यात आली़ तर डी़ जी़ पाटील यांना नाशिक जिल्ह्याची, डॉ़ हेमलता पाटील यांना जळगाव जिल्हा आणि महिला आघाडीचे कामकाज सोपविण्यात आले आहे़ योगेंद्र पाटील यांना धुळे व नंदुरबार आणि राज्य पातळीवरचे शिबिरांचे प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली़ 


Web Title: Anil Bhamre, Dhule's choice for the post of coordinator
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.