माझ्या उमेदवारीबाबत अमरिशभाईच आग्रही होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:47 PM2019-02-18T22:47:40+5:302019-02-18T22:48:40+5:30

रोहिदास पाटील : काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या सभेच्या तयारीबाबत बैठक

Amarishbhai was also insistent about my candidature | माझ्या उमेदवारीबाबत अमरिशभाईच आग्रही होते

dhule

Next

धुळे : मी लोकसभेला उमेदवारी करावी अशी अमरिशभाई यांची मनापासून इच्छा आहे़ तसे त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीला ठाम व स्पष्टपणे सांगून टाकले आहे, असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी सोमवारी काँग्रेसच्या बैठकीत सांगितले.
काँग्रेसच्या राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या १ मार्च रोजी आयोजित जाहीर सभेच्या तयारीसंदर्भात माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, विलास खोपडे, सभागृह नेते कमलेश देवरे, संदिप महाले, अ‍ॅड़ रविंद्र पाटील, अनिल मुंदडा, सव्वाल अन्सारी, नवाब बेग मिर्झा, करीम शेख, राजेंद्र देसले, निरंजन करनकाळ, माजी उपमहापौर ईस्माईल पठाण, माजी आमदार किसनराव खोपडे, पितांबर महाले, रमेश श्रीखंडे, विमलताई बेडसे, अक्षय छाजेड, बडा मुल्ला, रणजित भोसले, भटू चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ बैठकीत मार्गदर्शन करतांना आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, राहुल गांधीची ही निवडणुकीची सभा समजून कामाला लागा़
देशातील वातावरण बदलत असल्याने माजी मंत्री रोहिदास पाटील हेच काँग्रेसचे उमेदवार आहे. एकमेकांना खेचण्याच्या राजकारणामुळे विरोधकांना संधी मिळते़ पक्षही दुर्बल होतो़ म्हणून संघटीतपणे काम करुन काँग्रेसची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.
राजवर्धन कदमबांडे म्हणाले, राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर एकमेकांचे उणे-दुणे काढू नका़ चुकीच्या लोकांकडे सुत्रे गेली तर पश्चातापाची वेळ येते.
आमदार कुणाल पाटील म्हणाले, आपला खरा विरोधक भाजपा असून त्यांच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे़ खासदार राहुल गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही शेवटी केले.

Web Title: Amarishbhai was also insistent about my candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे