धुळ्यात १४ तासानंतर ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 03:46 PM2018-09-24T15:46:14+5:302018-09-24T15:47:42+5:30

देखाव्यांनी लक्ष वेधले, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

After 14 hours in Dhule, 'Shree's immersion rally' concludes | धुळ्यात १४ तासानंतर ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीची सांगता

धुळ्यात १४ तासानंतर ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुकीची सांगता

Next
ठळक मुद्देमंडळांनी केला पारंपारिक वाद्याचा वापरदेखाव्यांनी लक्ष वेधलेशांततेत पार पडली मिरवणूक

आॅनलाइन लोकमत
धुळे- येथे ‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गगनभेदी घोषणा देत मंगलमय वातावरणात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्ता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ही विसर्जन मिरवणूक तब्बल १४ तास सुरू होती. 
गणेश चतुर्थीला जिल्ह्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. अनंत चतुर्दशीला जिल्हयातील २८५ सार्वजनिक तर ३७ खाजगी मंडळांच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. धुळ्यात १४९ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 
विसर्जन मिरवणुकीच्या अग्रभागी जुन्या धुळ्यातील  मानाचा खुनी गणपती होता. या मंडळाची मिरवणूक दुपारी २ वाजता सुरू झाली. सजविलेल्या पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही मिरवणूक खुनी मशीदीजवळ पोहचली. त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मानाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर मोठ्या मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. यावेळी सर्वच मंडळांनी पारंपारिक वाद्याचा वापर केला. काही मंडळांनी सजीव देखावे केले होते. हे देखावे लक्षवेधक ठरले होते.  रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेवटच्या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

Web Title: After 14 hours in Dhule, 'Shree's immersion rally' concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे