दोंडाईचा : येथील जयहिंद कॉलनीत 2 लाख 9 हजार 600 रुपयांच्या घरफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी  दोंडाईचा  बसस्थानकात बसमध्ये चढणा:या एका प्रवाशाची 67 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली़
शिरपूर येथील राकेश राजेंद्रसिंग राजपूत हे गोपाल एग्रो येथे कामाला आहेत. त्यांनी बी-बियाणे दुकानदारांकडून उधारीची रक्कम वसूल केली होती़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते दोंडाईचा बसस्थानकात  दोंडाईचा -शिरपूर या बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या खिशातून 67 हजार रूपयांची रक्कम लंपास केली़  सदरचा प्रकार राकेश राजपूत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात  भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार प्रकाश पोतदार तपास करीत आहेत़ यापूर्वी 8 तारखेला नारायणसिंग पहाड़सिंग गिरासे यांच्याकडे 2 लाख 9 हजार 600 रुपयांची घरफोडी झाली होती़ सदरची घटना ताजी असतांनाच बुधवारी बसस्थानकात झालेल्या चोरीमुळे पोलिसांचा वचक नसल्याचे दिसून येत आह़े चोरी, घरफोडय़ांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आह़े