धुळे जिल्ह्यात १५ वर्षात  ६४६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 08:03 AM2018-11-16T08:03:26+5:302018-11-16T08:03:52+5:30

दुष्काळासह नापिकीचे संकट : चालू वर्षात आतापर्यंत ५९ आत्महत्या, २५ कुटुंबे मदतीस अपात्र चंद्रकांत सोनार

646 farmers in Dhule district have completed their life span in 15 years | धुळे जिल्ह्यात १५ वर्षात  ६४६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

धुळे जिल्ह्यात १५ वर्षात  ६४६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

Next

धुळे : सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, खासगी सावकाराचे कर्ज , शेतमालाचे घसरलेले दर यासह अन्य विविध कारणांमुळे गेल्या १५ वर्षांत जिल्ह्यातील ६६४ शेतकºयांनी जीवणयात्रा संपविली आहे़ यात चालूवर्षी अॉक्टोबरपर्यत ५९ शेतकºयांचा समावेश आहे़
जिल्हात गेल्यावर्षी तीन महिन्यात १४ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील लहान जिल्ह्यात आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे़ जिल्हात तीन वर्षापासून सतत दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ दरम्यान गेल्यावर्षी पावसाळ्यातील सुरवातीला जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात चौदा शेतकºयांनी शेतात विष प्राशन करणे, गळफास घेणे व विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या होत्या.

मृत्यूनंतरही सरकारचा शेतकºयांवर अन्याय

जिल्हयात २००४ ते २०१८ आॅक्टोंबर महिन्यापर्यत अशा पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत़ मात्र विदर्भाची ओळख दुष्काळग्रस्त असल्याने शेतकरी आत्महत्या सहज सरकारच्या रेकॉर्डवर येतात़ मात्र धुळे जिल्ह्यातील ६४६ आत्महत्या शासकिय रेकॉर्डवर आल्या असतांना देखील फक्त ३६२ आत्महत्या शासनाने ग्राह्य धरल्या आहेत़ तर जाचक अटींमुळे उर्वरीत तब्बल ४४ टक्के आत्महत्या अपात्र ठरविल्या आहेत़ त्यामुळे शेतकºयांवर सरकार त्यांच्या मृत्यूनंतरही अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्यात वर्षभरातील ७२ शेतकºयांची आत्महत्या जिल्ह्यातील शेतकºयांना शेतीशिवाय अन्य व्यवसाय नसल्याने कुटूंबाच उदनिर्वाह शेतीवर अवलंबून असतो़ एैनवेळी पावसाने दांडी मारल्याने अर्थिक संकटाला सामोरे जावे लागते़ त्यामुळे सरकारी व सावकारी कर्जाला कंटाळून आॅक्टोबर २०१७ ते आॅक्टोबर २०१८ या वर्षभरात ७१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ यात जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत बाळदे, हातनूर, गोराणे, कापडणे, बुरझडे, करवंद, मोघण, म्हसाळे कापडणे, अजंग, निमगुळ, होळ, चिंचखेडे, कुडाशी आदी चारही तालुक्यातील गावांमधील चौदा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात धुळे तालुक्यातील सर्वाधिक ७, शिंदखेडा २, शिरपूर २ आणि साक्री तालुक्यातील ३ शेतकºयांचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील शेतकºयांची नाराजी

 

जिल्ह्याला सतत तीन वर्षापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ यावर्षी शेतकºयांना उत्पन्नाची अशा होती़ मात्र पेरणीनंतर पावसाने मध्येच दांडी मारल्याने शेतकºयांना शेतात गुंतवलेले भांडवल देखील काढता आलेले नाही़ शासनाने दुष्काळ जाहीर करतांना धुळे, शिंदखेडा, शिरपूर या तिन्ही तालुक्यांचा समावेश केला आहे़ मात्र साक्री तालुक्याचा दुष्काळात समावेश न करून निसर्गाप्रमाणेच सरकारनेही अन्याय केल्याची शेतकºयांची भावना आहे. साक्रीचा दुष्काळी तालुक्यांत समावेश करण्यासाठी शेतकºयांचा लढा अद्याप सुरू आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांनी महाराष्ट्र बंदची हाक, विविध आंदोलने, लॉग मार्च केली केल्यानंतर कर्जमाफी घोषणा केली होती़ मात्र कर्जमाफी संदर्भातही राज्य सरकारची अनास्था दिसत असून गेल्या दीड वर्षांपासून शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे़ बहुतांश शेतकरी अद्याप कर्जमाफीपासून वंचित असल्याचे विदारक चित्र आहे. त्याचाच परिपाक म्हणून या घटनांत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने याची दखल घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त होताना दिसते.

गेल्या वर्षी सहाच शेतकऱ्यांचे आत्महत्या पात्र
जिल्ह्यात चारवर्षापासुन तिसºयांदा दुष्काळाच्या संकटाला शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे गेल्यावर्षी चारही तालुक्यातील चौदा शेतकºयांनी जीवणयांत्रा संपविली होती़ त्यापैकी सहाच शेतकरी आत्महत्या म्हणून पात्र ठरविल्या होत्या़ दरम्यान सरकारच्या जाचक अटीमुळे दरवर्षी शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविल्या जातात.

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे कारणे
जिल्हात सतत दुष्काळी परिस्थती शेतमालांचे मालास हमीभाव नसल्याने नाराजी कर्जमाफीची ठप्प झालेली प्रक्रिया कर्जप्रकियेत शेतकºयांना बँकांचा ठेंगा खासगी सावकारांचा शेतकºयांना चक्रवाढीने व्याजदर कुटुंबिक खर्चासह मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बेरोजगारीचा प्रश्न प्रगतीच्या विचाराने शेतकºयांनी गाठला ‘अ’ दर्जा

 

Web Title: 646 farmers in Dhule district have completed their life span in 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.