सरकारी कर्मचारी बँकेच्या चेअरमनसह ४६ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:01 AM2018-09-13T05:01:21+5:302018-09-13T05:01:44+5:30

ए.टी.एम. खरेदीत पाच कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी धुळे - नंदुरबार गर्व्हमेंट सर्व्हंट बॅँकेच्या चेअरमनसह संचालक मंडळ व अधिकारी अशा ४६ जणांविरूद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

46 people, including government employees bank chairman | सरकारी कर्मचारी बँकेच्या चेअरमनसह ४६ जणांवर गुन्हा

सरकारी कर्मचारी बँकेच्या चेअरमनसह ४६ जणांवर गुन्हा

Next

धुळे : ए.टी.एम. खरेदीत पाच कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी धुळे - नंदुरबार गर्व्हमेंट सर्व्हंट बॅँकेच्या चेअरमनसह संचालक मंडळ व अधिकारी अशा ४६ जणांविरूद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष लेखा परीक्षक वसंत राठोड यांनी या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. कर्जावरील व्याज वसूल झाले नसताना त्याचे ४ कोटी ४४ लाख ५३ हजार २०५ रुपयांचे उत्पन्न दर्शविण्यात आल्याचे तसेच ए.टी.एम. खरेदीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: 46 people, including government employees bank chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.