जिल्ह्यात ३९ कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:05 PM2019-05-21T12:05:08+5:302019-05-21T12:06:16+5:30

गाळमुक्त धरण : मोफत गाळ नेण्याचे प्रशासनाचे शेतकयांना आवाहन

39 work sanctioned in the district | जिल्ह्यात ३९ कामांना मंजुरी

साक्री तालुक्यात दहिवेल शिवारात धरणातून काढलेला गाळ अशा पद्धतीने टाकण्यात आला आहे. या सुपीक गाळामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते, असा शेतकयांचा अनुभव आहे. 

Next

धुळे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धरणांसह पाझर तलाव, बंधारे यांत साठलेला गाळ उपसण्याच्या ३९ कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या अंतर्गत काढण्यात येणारा सुपीक गाळ  शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार आहे. शेतकºयांनी या सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. या योजनेसाठी अनुलोम संस्था व टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहे. 
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या सर्वाधिक १६३ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून वनविभागाच्या ९६, कृषी विभागाच्या ६, धुळे पाटबंधारे विभागाच्या १८, लघुसिंंचन (जलसंधारण)च्या १४ व लघुपाटबंधारे विभागाच्या ३ कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत ४६ लाख घनमीटर काम होणार आहे. हे काम पाऊस सुरू होईपर्यंत चालणार आहे. 
अनुलोम संस्था व टाटा ट्रस्ट यांच्यातर्फे धरणांमधील गाळ उपसण्यासाठी जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ११.९२ पैसे घनमीटर असा दर निश्चित करण्यात येऊन डिझेलचा खर्च शासनातर्फे दिला जाणार आहे. विविध विभागांतर्फे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. 
स्पर्धेतील गावांना प्राधान्य 
या योजनेंतर्गत सध्या सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. 
ज्या शेतकºयांना हा गाळ न्यायचा असेल त्यांनी जलाशयाचे नाव व शेतकºयांची यादी जिल्हा रोहयो शाखेत द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


या योजनेंतर्गत मोठ्या धरणांसह जुन्या पाझर तलावांमधील गाळही काढण्यात येणार आहे. त्या-त्या परिसरातील शेतकयांनी बैलगाडी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा गाळ नेऊन आपल्या शेतात टाकावा, अशी अपेक्षा आहे. गाळ मोफत दिला जाणार आहे. केवळ त्याच्या वाहतुकीचा खर्च शेतकºयांना करावा लागणार आहे. 
गोविंद दाणेज
उपजिल्हाधिकारी, रोहयो

 

Web Title: 39 work sanctioned in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे