शिरपूरला पकडली २ लाखांची दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:07 PM2019-02-03T12:07:57+5:302019-02-03T12:08:42+5:30

एलसीबी : दोन जण ताब्यात

2 lakhs of liquor found in Shirpur | शिरपूरला पकडली २ लाखांची दारु

शिरपूरला पकडली २ लाखांची दारु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिरपूरनजिक शेतातील झोपडी वजा घरातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दारु आणि साधनासह २ लाख १४ हजार १९० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई शनिवारी सायंकाळी पावणे पाच वाजता करण्यात आली़ याप्रकरणी रामचंद्र भंगी पावरा (२६, रा़ सलईपाडा ता़ शिरपूर) आणि पप्पू सोनार (रा़ शिरपूर) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली़ त्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ 

Web Title: 2 lakhs of liquor found in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.