ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 14 -  शहरासह जिल्ह्यात सध्या डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लूची साथ सुरू आह़े जिल्हाभरात आतार्पयत डेंग्यूचे तब्बल 180 संशयित रूग्ण आढळले असून त्यापैकी 142 रूग्ण धुळे शहरातील आह़े तर एकूण 23 रूग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाने दिली़
धुळे शहरासह जिल्ह्यात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यू, मलेरियाच्या रूग्णांची संख्या कमी असली तरी या आजारांच्या रूग्णसंख्येत वाढ होत आह़े खासगी दवाखान्यांमधील प्राथमिक चाचण्या केल्यानंतर डेंग्यू संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमुने जिल्हा सवरेपचार रूग्णालयात तपासणीसाठी पाठविले जातात़ शहरात आतार्पयत मोहाडी उपनगर, साक्री रोड, झोपडपट्टी भाग, गोकुळनगर, गौरी सोसायटी, साईदर्शन कॉलनी या भागात डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळल्याने उपाययोजना सुरू आहेत़ महासभेतही डेंग्यूबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली होती़ 
दरम्यान, केवळ शहरातच नव्हे तर  जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळत आहेत़ शिरपूरमध्ये डेंग्यूचे रूग्ण आढळले नसले तरी मलेरियाचे 10 रूग्ण आढळून आले आहेत़ जिल्ह्यात आतार्पयत डेंग्यूचे 180 संशयित रूग्ण आढळले असून त्यापैकी 23 रूग्णांना डेंग्यू निष्पन्न झाला आह़े तर मलेरियाचे 1 लाख 94 हजार 860 संशयित रूग्ण आढळले असून त्यापैकी 53 रूग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आह़े  स्वाईन फ्लूची साथही शहरात पसरली असून दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वाढ होत आह़े मात्र मनपाकडे सध्यातरी दोनच रूग्ण आढळल्याची नोंद आह़े
शहरात साथीच्या आजारांचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असतांना अस्वच्छतेची समस्या शहरी तसेच ग्रामीण भागातही कायम आह़े  जानेवारी ते जुलैर्पयत साथीच्या आजारांची रूग्णसंख्या नियंत्रणात असली तरी ऑगस्ट व सप्टेबर या दोन महिन्यांत रूग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आह़े
पावसामुळे आजारांचे प्रमाण वाढल़े़
गेल्या आठवडाभरात शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आह़े त्यामुळे रस्त्यांवरील खड्डयांसह ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून पर्यायाने डासांची घनता देखील वाढली आह़े 
शहरी व ग्रामीण भागात रोटेशन पध्दतीने कंटेनर सव्र्हे, फवारणी, धुरळणी, अॅबेटिंग, डासोत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडणे, जनजागृतीचे काम करण्यात येत आह़े 
गेल्या वर्षी डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू असतांना मनपा आरोग्य विभागात औषधसाठा संपुष्टात आला होता, मात्र यंदा पुरेसा औषधसाठा उपलब्ध आह़े


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.