धुळे जिल्ह्यात १७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:19 PM2018-02-18T17:19:45+5:302018-02-18T17:20:46+5:30

९५ केंद्र, ९०४ विद्यार्थी अनुपस्थित, परीक्षा शांततेत पार पडली

17,000 students got scholarship examination in Dhule district | धुळे जिल्ह्यात १७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

धुळे जिल्ह्यात १७ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देपाचवीसाठी ४५ तर आठवीसाठी ४० केंद्रबैठे पथकाची केली होती नियुक्ती परीक्षा सुरळीत पार पडली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : इयत्ता पाचवी व आठवीसाठी रविवारी जिल्ह्यातील ९५ केंद्रावर १७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा दिली. ९०४ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा शांततेत पार पडली. दरम्यान परीक्षा केंद्रांना पुण्याचे निरीक्षक कृष्णकुमार पाटील यांनीही भेटी दिल्या.
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा आज घेण्यात आली. पाचवीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून ९ हजार २०७ विद्यार्थी प्रविष्ट होते.  त्यापैकी ८ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी ४५ केंद्रावर परीक्षा दिली. त्यासाठी ४५ केंद्र संचालक, ९ उपकेंद्र संचालक, ४४९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. ५८० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.  परीक्षा देणाºयांचे प्रमाण ९३.७२ टक्के होते.
त्याचप्रमाणे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा ४० केंद्रांवर झाली. यासाठी ८ हजार ७३८ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ८ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३२४ विद्यार्थी अनुपस्थित होते.परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ९६.२९ टक्के एवढे होते.यासांठी ४० केंद्र संचालक, ८ उपकेंद्र संचालक व ४२८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी ६० क्षेत्रीय अधिकाºयांची बैठे पथक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अधिकाºयांच्या भेटी
दमºयान शिक्षण विभागातील अधिकाºयांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देवून पहाणी केली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनीही शहरासह फागणे, साक्री तालुक्यातील म्हसदी येथील केंद्राना भेटी दिली,
परीक्षा सुरळीत : देसले
जिल्ह्यात शिष्यवृत्तीची परीक्षा सुरळीत पार पडली. कुठेही गोंधळ झाला नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

 

Web Title: 17,000 students got scholarship examination in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.