धुळ्यात १७ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:51 PM2018-07-21T16:51:33+5:302018-07-21T16:52:48+5:30

घर व गोडावूनमध्ये छापा : एलसीबीच्या कारवाईत एकाला अटक

17 lakhs of gutka caught in Dhule | धुळ्यात १७ लाखांचा गुटखा पकडला

धुळ्यात १७ लाखांचा गुटखा पकडला

Next
ठळक मुद्देधुळ्यातील घर आणि गोडावूनमध्ये एलसीबीची धाड१७ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्तएक जण पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील भंगार बाजार भागातील अन्सार नगरातील एका घरात आणि ऐंशी फुटी रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलनजिक एका गोडावूनमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी छापा टाकला़ त्यात गुटख्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत १७ लाख ५१ हजार २०० रुपये इतकी आहे़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे़ 
शहरातील आझादनगर भागात असलेल्या अन्सार नगर, भंगार बाजार आणि ऐंशी फुटी रोडवरील एका दुकानात गुटखा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना मिळाली़ माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेड कॉन्स्टेबल महेंद्र कापुरे, नथ्थू भामरे, सुनील विंचूरकर, संदिप थोरात, हिरालाल ठाकरे, पोलीस कर्मचारी प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, नितीन मोहने, मायूस सोनवणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, अशोक पाटील, तुषार पारधी, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, मनोज पाटील, मनोज बागुल, चेतन कंखरे, विजय सोनवणे, केतन पाटील यांनी छापा टाकला़ 
भंगार बाजारात असलेल्या अन्सार नगरमधील प्लॉट नंबर ८४ तसेच ऐंशी फुटी रोडवरील एका गोडावूनमध्ये हिरा, रजनीगंधा, विमलनामक गुटखा आढळून आला़ यात विमल गुटखा व जर्दा तंबाखू ही १० लाख ८० हजाराचा आहे़ रजनीगंधा पानमसाला हा ४ लाख ४३ हजार २०० रुपये किंमतीचा आहे़ याशिवाय २ लाख २८ हजार रुपये किंमतीचा हिरा गुटखा व जर्दा तंबाखू  असा एकूण १७ लाख ५१ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ 
घर आणि गोडावून हे मोहसीन करीम तांबोळी (३२, रा़ प्लॉट नंबर ८४, अन्सार नगर, भंगार बाजार, धुळे)  याच्या मालकीचे आहे़ परिणामी हा मुद्देमाल त्याचा असल्याची नोंद करण्यात आली आहे़ त्यालाही अटक करण्यात आली आहे़ पुढील तपास पोलीस करीत आहेत़ 

Web Title: 17 lakhs of gutka caught in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.