धुळे जिल्ह्यातील १० स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:19 AM2017-11-20T11:19:25+5:302017-11-20T19:35:25+5:30

धुळे जिल्हा पुरवठा विभाग : पॉस मशीन वाटप केल्यानंतरही गैरप्रकार सुरूच; ३५ दुकानदारांना नोटिसा

10 cheaper grain shops | धुळे जिल्ह्यातील १० स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

धुळे जिल्ह्यातील १० स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ९८५ स्वस्त धान्य दुकानदारांना पॉस मशीनचे वाटप जून ते आॅक्टोबर या कालावधीत ३५ स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी दुकानदार पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करत नव्हते; अशा तक्रारी

आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.२० : जिल्हा पुरवठा विभागाकडे केलेल्या तक्रारींवरून जिल्ह्यातील १० स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ यादरम्यान करण्यात आली असून संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडून ५२ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पॉस मशीनचे वाटप केल्यानंतरही अनेक दुकानांवर धान्य वितरणात गैरप्रकार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी खºया लाभार्र्थींंना धान्य वितरण केले पाहिजे; यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकातर्फे स्वस्त धान्य दुकानदारांवर ‘वॉच’ ठेवण्यात येत असतो. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकांतर्फे नियमित किंवा थेट धडक मोहीम राबविण्याात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 
दहा महिन्यात १,२०० तपासण्या 
जिल्हा पुरवठा विभागातर्फे जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत नियमित तपासणी १००५, धडक मोहिमेंतर्गत १७३ तर प्राप्त तक्रारींवरून २२ अशा एकूण १२०० तपासण्या केल्या आहेत.  त्यात ७३ दुकानांमध्ये किरकोळ, २० दुकानांमध्ये मध्यम तर दोन दुकानांमध्ये गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागातर्फे संबंधित दुकानदारांना नोटिसांद्वारे खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पुरवठा विभागाने एका दुकानाचा परवाना निलंबित केला असून उर्वरित जिल्ह्यातील नऊ दुकाने ही कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.  
गेल्यावर्षी ३३ दुकानांवर कारवाई 
२०१६ मध्ये जिल्हा पुरवठा विभागाने ३३ दुकानांवर केलेल्या कारवाईत संबंधितांकडून १ लाख ५२ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. तर २०१६ मध्ये जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने तब्बल १५०० हून अधिक स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये तपासण्या केल्या होत्या. 

जिल्ह्यात या स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या नोटिसा 
धुळे तालुका : रेशन दुकान क्रमांक १३ (चौगाव), दुकान क्रमांक २५ (आंबोडे), दुकान क्रमांक ५१ (वडणे), दुकान क्रमांक ११६ (सैताळे), दुकान क्रमांक १४० (गोताणे), दुकान क्रमांक १६१ (चौगाव), दुकान क्रमांक १७० (पिंप्री), दुकान क्रमांक : १७८ (भोकर), दुकान क्रमांक १७९ (हिंगणे), दुकान क्रमांक १८६ (मोहाडी प्र. डांगरी), दुकान क्रमांक १९६ (नांद्रे), दुकान क्रमांक ११९ (बल्हाणे), दुकान क्रमांक २०१ (दापुरी), 
साक्री तालुका : दुकान क्रमांक २४३ (आमोडे), दुकान क्रमांक १८२ (धाडणे), दुकान क्रमांक १७० (मळखेडे), दुकान क्रमांक २५४ (दहिवेल), दुकान क्रमांक २३ (दहिवेल), दुकान क्रमांक २८३ (मळगाव), दुकान क्रमांक १२८ (जामदे), दुकान क्रमांक १०२ (चरणमाळ), दुकान क्रमांक १२९ (छडवेल कोर्डे), दुकान क्रमांक २६९ (दुसाणे), दुकान क्रमांक २८० (जिरापूर), दुकान क्रमांक २०० (करंझटी), दुकान क्रमांक १४५ (गंगापूर), 
शिरपूर तालुका : दुकान क्रमांक ५१ (वाघाडी), दुकान क्रमांक ७२  (वरझडी), दुकान क्रमांक ७८ (शिंगावे), दुकान क्रमांक ८७ (अंतुर्ली), दुकान क्रमांक १३१ (हिंगोणीपाडा), दुकान क्रमांक १७१ (बटवापाडा), दुकान क्रमांक १८१ (शिंगावे), दुकान क्रमांक १९५ (वरूळ), दुकान क्रमांक १२८ (अभाणपूर)  या दुकानांचा समावेश आहे. 

Web Title: 10 cheaper grain shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.