आंबेगाव पठार येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 11:43 AM2018-12-07T11:43:05+5:302018-12-07T11:44:13+5:30

पूर्वी झालेल्या भांडणातुन तरुणाचा कोयता आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना आंबेगाव पठारमधील साई सबुरी चौकाजवळ घडली.

youth murdered due to former quarrel incident ; crime registred against Five accused | आंबेगाव पठार येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा दाखल

आंबेगाव पठार येथे पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून ; पाच जणांवर गुन्हा दाखल

Next

पुणे : पूर्वी झालेली भांडणातुन तरुणाचा कोयता आणि चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आंबेगाव पठारमधील साई सबुरी चौकाजवळ घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दाखल असून त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विनायक मारुती पवार (वय २३ वर्ष रा. शनीनगर कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश मारुती शिर्के (वय २७. धदा-व्यवसाय रा. स.न ६५, तळजाई वसाहत, वनशिव वस्ती रोड, पदमावती ) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार गणेश गायकवाड , विशाल कांबळे,  प्रकाश रेणुसे , बाळा शेडकर, गौरव ऊर्फ गोग्या भामरे( सर्व रा.चव्हाणनगर,शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड याचे संदिप गेजगे याच्या बरोबर महिन्यापुर्वी भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी यांचा मामे भाउ विनायक पवार याने गणेश गायकवाड यास फोन केला व त्यांचा बोलविल्यावरुन गणेश गायकवाड, विशाल कांबळे, प्रकाश रेणुसे, बाळा शेंडकर, गौरव ऊर्फ गोग्या भामरे हे आंबेगाव पठार येथील सर्वे नंबर 16 मधील साई सबुरी चौकातून उताराने येणाऱ्या रस्त्यावर नक्षत्र बिल्डिंगचे गेट समोर आले. तेथे तेथे वाट पहात थांबलेले विनायक पवार व त्याचे मित्र संदीप गेजगे व विकास धुमाळ यांना गाठून गेल्या दोन वर्षांपूर्वी चव्हाणनगर शंकर महाराज वसाहत येथे विशाल कांबळे व प्रकाश रेनुसे यांचे विनायक पवार यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विशाल कांबळे, बाळा शेंडकर प्रकाश रेणुसे यांनी त्यांच्याकडील चाकू व कोयत्याने विनायक पवार यांच्या छाती, कमरेवर, उजव्या हाताच्या कोपरावर व पाठीवर डाव्या बाजूस कमरेजवळ तर गणेश गायकवाड व गोग्या भामरे यांनी फुटलेल्या जात्याच्या दगडाने विनायक यांच्या पाठीवर दगड घालून त्यांचा खून केला.  
घटनेची माहिती मिळताच समीर शेख ( सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हें १), राम मांडूरके ( सहा.पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग), विष्णु पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विदयापीठ पो. स्टे), विजय टिकोळे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-२), विष्णु ताम्हाणे , (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विदयापीठ पो.स्टे), जयवंत जाधव ( सहाय्यक पोलीस निरीक्षक युनिट-२), एम.एम. साळुखे (सपोनि भारती विदयापीठ पो.स्टे), चिवड शेटटी (सपो.नि. भारती विदयापीठ पो स्टे), शिवदास गायकवाड (पोलीस उप निरीक्षक भारती विदयापीठ पो.स्टे) यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंके करीत आहेत.

Web Title: youth murdered due to former quarrel incident ; crime registred against Five accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.