वायटी एंटरटेनमेंट कंपनीने अभिनेता अर्जुन रामपालविरोधात केली फसवणुकीची तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:57 PM2018-12-22T15:57:00+5:302018-12-22T15:59:05+5:30

अर्जुनने व्याजने पैसे घेतले होते, मात्र अद्यापही ते परत केले नसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 

Youth Entertainment Company Complaint Against Actor Arjun Rampal | वायटी एंटरटेनमेंट कंपनीने अभिनेता अर्जुन रामपालविरोधात केली फसवणुकीची तक्रार   

वायटी एंटरटेनमेंट कंपनीने अभिनेता अर्जुन रामपालविरोधात केली फसवणुकीची तक्रार   

ठळक मुद्दे वायटी एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने ही तक्रार केली आहे ९० दिवसांत पैसै परत करण्याच्या अटीवर कंपनीकडून १ कोटी रुपये घेतले होतेअद्याप अर्जुन रामपालची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. वायटी एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने ही तक्रार केली आहे. अर्जुनने व्याजने पैसे घेतले होते, मात्र अद्यापही ते परत केले नसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. 

अर्जुनने ९० दिवसांत पैसै परत करण्याच्या अटीवर कंपनीकडून १ कोटी रुपये घेतले होते. १२ टक्के व्याजाने हे पैसे घेतले गेले होते. मात्र, ९० दिवस उलटून अद्यापही त्याने हे पैसे परत केले नसल्याने आर्थिक फसवणुकीचा दावा कंपनीने केला आहे. अर्जुनने कंपनीला एक चेक देखील दिला होता. मात्र, तो चेक देखील बाऊन्स झाल्याने वायटी एंटरटेनमेंट लिमिटेड कंपनीने त्याच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली. यावर अद्याप अर्जुन रामपालची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

Web Title: Youth Entertainment Company Complaint Against Actor Arjun Rampal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.