जेजुरीहून पळविलेली दीड वर्षाची मुलगी आईच्या स्वाधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 08:51 AM2019-07-06T08:51:38+5:302019-07-06T08:51:59+5:30

जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

A year-old girl escaped from Jejuri, handed her mother | जेजुरीहून पळविलेली दीड वर्षाची मुलगी आईच्या स्वाधीन

जेजुरीहून पळविलेली दीड वर्षाची मुलगी आईच्या स्वाधीन

Next

पुणे - जेजुरी एस टी बसस्थानकावरुन पळून नेलेल्या दीड वर्षाच्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तब्बल ७ दिवसानंतर ही मुलगी सापडली आहे़ मुल होत नसल्याने एका जोडप्याने या मुलीचे अपहरण केले होते.

सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता. बारामती, सध्या रा. कोलवडी ता़ हवेली) व त्याच्या पत्नीला अटक केली आहे. लग्नाला सात वर्षे झाले तरी मुलबाळ होत नसल्याने त्यांनी पाळत ठेवून या मुलीला पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, लिला ऊर्फ सुरेखा विनोद भैसारे (वय ३५, रा़ जेजुरी) या तिची लहान मुलगी जान्हवी विनोद भेसारे (वय दीड वर्षे) हिला घेऊन नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी एस टी बसस्टँडला जात होत्या़ त्यावेळी कोणीतरी त्यांची नजर चुकवून मुलीला पळवून नेले.

स्थानिक गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर एका पल्सरवरील संशयितावर पोलिसांनी सर्व लक्ष केंद्रीत केले. आरोपीचे फोटो बनवून त्याआधारे बातमीदारांमार्फत चौकशी करण्यास सुरुवात केली़ तेव्हा या आरोपीचे नाव सागर पांडुरंग खरात (मुळ गाव माळेगाव बुद्रुक, ता़ बारामती, सध्या रा़ कोलवडी ता़ हवेली) असे असल्याचे समजले. तो हडपसर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला हडपसर येथून ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर जान्हवी हिला कोलवडी येथे पत्नीकडे ठेवले असल्याचे सांगितले़ पोलिसांनी कोलवडीस जाऊन जान्हवीला ताब्यात घेतले व तिच्या आईच्या स्वाधीन केले़ 

लग्नाला ७ वर्षे झाल्यानंतरही मुळबाळ होत नसल्यामुळे जेजुरी बस स्टँडवर पाळत ठेवून त्यांनी जान्हवीला पळून नेले होते. सात दिवसाच्या तपासानंतर मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील या पथकाला बक्षीस जाहीर केले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार चंद्रकांत झेंडे, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, राजू मोमीन, प्रमोद नवले, पुनम कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: A year-old girl escaped from Jejuri, handed her mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.