महिलांनी ग्राहक बनून सोनाराला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 05:37 PM2019-04-23T17:37:26+5:302019-04-23T17:40:45+5:30

तीन अनोळखी महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता.

Women became a customer and robbed gold | महिलांनी ग्राहक बनून सोनाराला लुटले

महिलांनी ग्राहक बनून सोनाराला लुटले

Next
ठळक मुद्दे दोन महिला दुकानदार व कामगारांना बोलण्यात गुंतवून ठेवले सोन्याचे कंगण ओढणीच्या सहाय्याने झाकून संमतीशिवाय चोरून पोबारा केला आहे.

नालासोपारा - वसई पश्चिमेकडील असलेल्या त्रिभुवनदास भिमजी झवेरी या ज्वेलर्सच्या दुकानात रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश केला होता. त्यांनी हातातील बांगड्या आणि कंगण दाखविण्यास सांगितले. दोन महिला दुकानदार व कामगारांना बोलण्यात गुंतवून ठेवले असताना कोणी पाहत नसल्याचा गैरफायदा घेत तिसऱ्या महिलेने एका ट्रे मधील 2 लाख 36 हजार रुपये किंमतीचे हातामधील 8 तोळे वजनाचे सोन्याचे कंगण ओढणीच्या सहाय्याने झाकून संमतीशिवाय चोरून पोबारा केला आहे. दुकानदाराच्या नंतर ही बाब लक्षात आल्यावर माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन सोमवारी तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. 

Web Title: Women became a customer and robbed gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.