अॅफेटामाइन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेला बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 08:41 PM2018-09-19T20:41:31+5:302018-09-19T20:43:59+5:30

एका महिला दलालाच्या मदतीने हे अमली पदार्थ मुंबईत विकले जाणार असल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित महिलेला कांदिवलीतून ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

The woman who smacks of aphtaminine drug trafficking | अॅफेटामाइन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेला बेड्या  

अॅफेटामाइन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेला बेड्या  

Next

मुंबई - अमली पदार्थाविरोधी मोहिमेसाठी पोलिसांनी कंबर कसली अाहे. त्यामुळे तस्करांनी आता अंमली पदार्थ पोचवण्यासाठी महिलांचा वापर करण्यास सुरूवात केल्याचं अनेक कारवायातून उघडकीस अालं अाहे. नुकतंच मुंबई अमली पदार्थ विभाग आणि केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी ) ४६५ ग्रॅम अॅफेटामाइन ड्रग्जसह एका २७ वर्षीय महिलेला अटक केली आहे. अमली पदार्थ मुंबईत तस्करीसाठी आणले असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एका महिला दलालाच्या मदतीने हे अमली पदार्थ मुंबईत विकले जाणार असल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित महिलेला कांदिवलीतून ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक महिला अॅफेटामाइन हे ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबी आणि मुंबई अंमली पदार्थ विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोन्ही पथकांनी मंगळवारी विमानतळावर सापळा रचला. यावेळी परदेशातून आलेल्या शेख फुरकाना खातून ही महिला विमानतळाच्या इमिग्रेशन विभागात बॅग तपासणीसाठी आली होती. सुरक्षा रक्षकांनी बॅग तपासली.  त्यांना काही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, श्वान पथकांनी दुसऱ्यांदा शेख यांची बॅग तपासली असता ड्रग्जच्या वासाने कुत्र्यांनी भुंकण्यास सुरूवात केली. पोलिसांनी बॅगेची झडती घेतली असता बॅगेच्या एका कोपऱ्यात ड्रग्ज सापडले. हे ड्रग्ज बॅगेच्या आतल्या बक्कलमध्ये लपवले होते. या ४६५ ग्रॅम अॅफेटामाइन ड्रग्जची किंमत ही २३ लाख २५ हजार इतकी अाहे. 

Web Title: The woman who smacks of aphtaminine drug trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.