टोचून बोलते म्हणून केला पत्नीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 08:32 PM2019-02-08T20:32:18+5:302019-02-08T20:32:59+5:30

गळा आवळून झोपून राहिला रात्रभर मृतदेहा शेजारी

Wife murdered as he speaks in a speech | टोचून बोलते म्हणून केला पत्नीचा खून

टोचून बोलते म्हणून केला पत्नीचा खून

googlenewsNext

मुरुम (जि़.उस्मानाबाद) : पत्नी टोचून बोलते म्हणून तिचा गळा आवळून खून केल्याची घटना उमरगा तालुक्यातील मुरुम येथे गुरुवारी रात्री घडली आहे़ रात्रभर मृतदेहाशेजारीच झोप काढल्यानंतर सकाळी उठून आरोपीने पोलीस ठाणे गाठले़ याप्रकरणी चौकशी करुन पोलिसांनी सांयकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे़ मुरूम येथील संभाजी नगरात वास्तव्यास असलेल्या विनोद धनसिंग पवार याचा विवाह नाईकनगर (ता.उमरगा) येथील प्रियंका खिरु राठोड यांच्याशी नऊ महिन्यांपूर्वी झाला होता. दरम्यान, प्रियंका ही पाच महिन्याची गरोदर होती. विनोद हा मुरूम येथे बोअरवेल कमिशन एजंटचा व्यवसाय करीत होता़ तर प्रियंका ही तुळजापूर येथे परिचारिका म्हणून नोकरी करीत होती. नुकतीच प्रियंकाची उमरगा येथे बदली झाली होती. मात्र, अद्याप त्या याठिकाणी रुजू झालेल्या नव्हत्या़ त्यामुळे तुळजापूर येथून सध्या त्या ये-जा करीत होत्या़ बदलीवरुन प्रियंका व विनोद यांच्यात बुधवारीच किरकोळ वादावादी झालेली होती़ गुरुवारी सकाळी तुळजापूर येथून ड्युटी संपवून प्रियंका मुरुमला परतल्या होत्या़ दरम्यान, गुरुवारी रात्री विनोद हा उशिरा घरी आला असता, पुन्हा वाद होवून विनोदने प्रियंका यांचा गळा आवळून खून केला़ शुक्रवारी सकाळी स्वत: पोलिसांत हजर होवून त्याने घटनेची माहिती दिली़ यानंतर उपनिरीक्षक डी़पी़ सानप यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले़ याप्रकरणी मुरुम ठाण्यात आरोपी विनोद पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे मुरुम पोलिसांनी सांगितले़ आरोपीनेच दिली कबुली़़़ आपली पत्नी नेहमीच किरकोळ कारणावरून आपणास टोचून बोलते़ त्यामुळे रागाच्या भरात आपण तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली विनोद पवार यांनी पोलिसांकडे दिली आहे़ विशेष म्हणजे, खून केल्यानंतर प्रियंकाच्या मृतदेहाशेजारीच झोपून त्याने रात्र काढली़

Web Title: Wife murdered as he speaks in a speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस