ठळक मुद्देया मुलाच्या हिंमतीला लोकांकडून शाबासकी मिळतेय.सोशल मीडियावरही ती व्हिडीयो आणि बातमी प्रचंड व्हायरल झाली आहे. मुलाने पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली आहे.

भोपाळ : आपल्याकडे नियम मोडण्यासाठी नियम बनवले आहेत असं म्हटलं जातं. कित्येक वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा अपघातही घडतात. पण अशाच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याविरोधात एका तरुणाने बंड पुकारलं आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. पाहा व्हिडीयो-

भोपाळमधील एका रस्त्यावर महिंद्रा एसयुव्ही ही गाडी रस्त्यावरून उलट दिशेने जात होती. त्याच्याविरोधात साहिल बटाव या २२ वर्षीय तरुणाने आपली बाईक गाडीच्या समोरच नेऊन उभी केली. बाईक बाजूला घे म्हणून एसयुव्हीचालकाने बरीच विनंती केली. मात्र तो काही जागचा हालला नाही. त्यांच्यात बरीच वादावादी झाली. तरीही साहिल मागे हटायला तयार नव्हता. त्याने आपली बाईक त्याच्या गाडीसमोरून काढलीच नाही. त्याने त्या महिंद्रा गाडीचा फोटोही काढला. हा सगळा प्रकार झाला तेव्हा अनेकांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली. शेवटी महिंद्रा गाडीचालक आणि साहिल यांच्याच मारमारी झाली, तेव्हा काही प्रवाशांनी त्यांची झटापट सोडवली. आपण आता एकटेच आहोत असं महिंद्रा चालकाला समजलं तेव्हा त्याने आपली गाडी रिव्हर्स घेतली आणि योग्य दिशेने निघून गेला.

साहिलने याबाबत भोपाळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही आपल्याला योग्य सहकार्य केल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केलीय.दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलं असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येकाविरोधात असा पवित्रा प्रत्येकाने उगारला तर आपला देश नक्कीच पुढे जाईल.