Video : विवाहितेची छेड काढणाऱ्या भामट्याला महिलांनी दिला बेदम चोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 07:22 PM2019-01-10T19:22:04+5:302019-01-10T19:24:34+5:30

तुषार बनसोडे असं त्या नराधमचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे.

Video: The women gave a hint of a cruelty to marriage | Video : विवाहितेची छेड काढणाऱ्या भामट्याला महिलांनी दिला बेदम चोप 

Video : विवाहितेची छेड काढणाऱ्या भामट्याला महिलांनी दिला बेदम चोप 

Next
ठळक मुद्देतुषार हा डोंबिवलीतील नांदिवली टेकडी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेची गेल्या ४ महिन्यापासून छेड व अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास देत होता. तुषारने सोमवारी पुन्हा पीडित विवाहितेशी भर रस्त्यात लगट करण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवली - महिलेची छेड काढणाऱ्या भामट्याला काही महिलांनी अद्दल घडवत चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तुषार बनसोडे असं त्या नराधमचे नाव असून तो डोंबिवलीतील सहागाव परिसरात राहणारा असल्याचे समोर आले आहे.  

तुषार हा डोंबिवलीतील नांदिवली टेकडी परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेची गेल्या ४ महिन्यापासून छेड व अश्लील शेरेबाजी करून तिला त्रास देत होता. पीडित महिला ही मोलकरीण असल्याने ती त्रास सहन करीत होती. याचाच फायदा घेत या भामट्याने काही दिवसापूर्वीच तिला भररस्त्यात गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पीडिताने कुटुंबाला व ती ज्या ठिकाणी घरकाम करण्यासाठी जाते तेथील मालकिणीला सांगितली होती. त्यानंतर पीडित महिलेचे कुटुंब तुषारला जाब विचारण्यासाठी गेले असता, त्याने उलट त्यांनाच धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. 

तुषारने सोमवारी पुन्हा पीडित विवाहितेशी भर रस्त्यात लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या काही महिला तिच्या मदतीला धावून आल्या. तुषारला जाब विचारला असता त्याने याही महिलांसोबत अरेरावी केली. यामुळे या महिलांनी चप्पला काढून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून चोप देणाऱ्या महिलांनी पीडित महिलेची माफी मागायला त्याला भाग पाडले. हा प्रकार १० ते १५ मिनिटे सुरू होता. त्यावेळी कोणीतरी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, महिलांनी या तुषारची चप्पलेने चोप देत त्याची धिंड काढण्यात आली होती.

Web Title: Video: The women gave a hint of a cruelty to marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.