Video:लोकलमध्ये पुन्हा माकडचाळे; हार्बरच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 07:18 PM2018-10-16T19:18:22+5:302018-10-16T19:18:55+5:30

प्लॅटफॉर्मवर घसटत इतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाश्यांना लाथ उगारताना दिसत आहे. या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Video: Rectified in locals; Type of incident at Sandhurst Road station in Harbor | Video:लोकलमध्ये पुन्हा माकडचाळे; हार्बरच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर घडला प्रकार

Video:लोकलमध्ये पुन्हा माकडचाळे; हार्बरच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर घडला प्रकार

Next

मुंबई - अलीकडे मध्य रेल्वे असो की पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे या तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकलमध्ये माकडचाळे करणाऱ्यांनी हैदोस घातला आहे. याबाबतचे अनेक व्हिडीओ देखील सोशल साईड्सवर वायरल होत आहेत. आज दुपारी ३. ४० वाजताच्या सुमारास हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर एक अज्ञात तरुण माकडचाळे करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अज्ञात तरुण लोकलच्या दरवाज्याचा लोखंडी दांडा हाताने पकडून प्लॅटफॉर्मवर घसटत इतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाश्यांना लाथ उगारताना दिसत आहे. या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: Video: Rectified in locals; Type of incident at Sandhurst Road station in Harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.