Unidentified bag found at Wadala railway station | Video : वडाळा रेल्वे स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
Video : वडाळा रेल्वे स्थानकात बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

ठळक मुद्दे रेल्वे सुरक्षा दलाने वेळीच बॅग असलेला परिसर प्रवाशांना बंद करून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) बोलावून श्वानामार्फत तपासणी करून बेवारस बॅग तपासण्यात आली. पोलिसांना सापडलेली बॅग रेल्वे स्थानक परिसरात कशी आणि कोणी ठेवली याबाबत सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.

मुंबई - वडाळा रेल्वे स्थानक परिसरात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका छताच्या खांबाखाली एक बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकात खळबळ मजली तसेच प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे सुरक्षा दलाने वेळीच बॅग असलेला परिसर प्रवाशांना बंद करून बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) बोलावून श्वानामार्फत तपासणी करून बेवारस बॅग तपासण्यात आली. मात्र त्या बेवारस बॅगेत कपडे आणि नेहमीच्या वापरातील वस्तू आढळून आल्या. 

वडाळा रेल्वे स्थानक हे हार्बर मार्गावरील जंक्शन असल्याने बेवारस बॅग आढळून आल्यामुळे काही वेळ रेल्वे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळीच रेल्वे सुरक्षा दलाने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक आणि श्वान पथक परिसरात दाखल करून बेवारस बॅगेची तपासणी केली. या बॅगेत नेहमीच्या वापरातील कपडे आणि काही वस्तू आढळून आल्या. या घटनेचा अधिक तपास वडाळा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल करत आहेत. पोलिसांना सापडलेली बॅग रेल्वे स्थानक परिसरात कशी आणि कोणी ठेवली याबाबत सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.


Web Title: Unidentified bag found at Wadala railway station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.