Two-wheeler death due to under wheels of st bus | एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू 
एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू 

ठळक मुद्देयाबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद, एसटी चालक ताब्यात

दावडी : धामणटेक (ता खेड ) येथे खेड कनेरसर रस्त्यावर ३६ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या चाकाखाली आल्याने जागीच मुत्यू झाला ही घटना गुरुवारी (दि.६ डिसें.) रोजी दुपारी घडली आहे. दशरथ पांडुरंग शिंदे. (रा कव्हाळा, ठाकरवाडी -निमगाव,ता. खेड ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.याबाबत मयत शिंदे यांचा मामा काशिनाथ बाबु पडवळ यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एसटी चालक बाळाजी मारूती जोगदंड (वय.२९ रा. राक्षेवाडी, ता. खेड ) खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर आगाराची पाबळ कनेरसर या मार्गाच्या एसटी बसच्या चाकाखाली आला. दुचाकीस्वार धामणटेक येथून कनेरसर येथे जात असताना त्याला एसटीची जोरदार धडक बसली. शिंदे यास एसटी बसने सुमारे १० फुट मोटार सायकलसह त्याला फरफटत नेले. यामध्ये शिंदे यांचा जागीच मुत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख करत आहे...


Web Title: Two-wheeler death due to under wheels of st bus
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.