दोन ठिकाणी वेश्याव्यवसाय : थायलंडच्या पाच महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 03:00 AM2019-03-23T03:00:25+5:302019-03-23T03:00:38+5:30

पुणे शहरातील ‘हायप्रोफाईल एरिया’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोरेगाव पार्कातील स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली.

Two places of prostitution: Five women in Thailand get rid of | दोन ठिकाणी वेश्याव्यवसाय : थायलंडच्या पाच महिलांची सुटका

दोन ठिकाणी वेश्याव्यवसाय : थायलंडच्या पाच महिलांची सुटका

Next

पुणे : शहरातील ‘हायप्रोफाईल एरिया’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोरेगाव पार्कातील स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत थायलंडमधील पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच स्पामध्ये विद्यार्थिनीच रिसेप्शनीस्ट म्हणून कामाला ठेवण्यात येत असून, त्या माध्यमातून वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे दिसून आले आहे.

सागर कैलास परदेशी (वय ३६, रा. कोंढवा) व केवीन सॅमसंग सनी (वय ३0, रा. भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच कोरेगाव पार्क येथील लेन नं ६, पॉवर पॉईंट बिल्डिंग येथील एका स्पा सेंटरवर छापा टाकून महेश नामदेव शिंदे (३१, रा.भीमनगर, कोंढवा खुर्द), रितेश जोगिन यांच्या विरोधात वेश्या व्यवसाय चालविण्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वेश्याव्यावसाय तसेच अवैध धंदे बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कोरेगाव पार्कमधील घटनेवरून दिसत आहे. तत्पूर्वी गुन्हे शाखा, दोन सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना खबºयामार्फत कोरेगांव पार्क लेन क्रमांक ७ आणि ६ मध्ये स्पाच्या नावावर वेश्याव्यावसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याची शहानिशा करण्याकरिता सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मनीषा झेंडे, कर्मचारी शंकर संपत्ते, नितीन तेलंगे, नामदेव शेलार, तुषार अल्हाट, महिला कर्मचारी, ननिता येळे, अनुराधा धुमाळ, सुप्रिया शेवाळे व त्यांचे पथकाने सुकन्या स्पावर छापा टाकला.

या ठिकाणीवरून थायलंडमधील ३ मुलींची सुटका केली. तसेच, परदेशी व सनी या दोघांना अटक केली. तर, दुसºया कारवाईत लेन ६ मधील इलुमी स्पावर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी थायलंडच्या दोन मुलींची सुटका केली आहे. तर, इलुमा स्पाचा मालक राहुल राठोड हा थायलंडमध्ये राहतो. मुलींना पुण्यात पाठवत असे.

नेमकं काय चालते याची नव्हती माहिती
स्पामध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून सुटका केलेल्या नागालँड आणि मेघालयमधील मुली रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत असे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या महाविद्यालयात शिक्षण घेत पार्ट टाईम रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होत्या. मात्र त्यांना स्पामध्ये नेमक्या कशा पद्धतीने काम सुरु असते याची माहिती नव्हती.

पोलीस प्रशासनाने परराज्यातून आलेल्या विद्यार्थिनींनी स्पामध्ये नोकरी करताना पूर्ण चौकशी करावी. असे आवाहन केले आहे. दुसरीकडे शहरातील वेश्याव्यवसायातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून नुकत्याच एका कारवाईत आधार व पॅनकार्ड नागपूर व मुंबईत बनविले जात असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Two places of prostitution: Five women in Thailand get rid of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.