Two kg of gold smugglers to the international airport | आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ किलो सोनं तस्करी करणाऱ्यास बेड्या 
आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ किलो सोनं तस्करी करणाऱ्यास बेड्या 

मुंबई - कस्टमच्या विमानतळ गुप्तचर विभागाने (एआययू) ५८ लाखांची २ किलोग्राम सोन्याची बिस्किटं आज जप्त केली आहे. तसेच सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला देखील मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी कोझिकोडे येथून मुंबईत आला होता. त्याच्याकडे १०० ग्रामची प्रत्येकी १० सोन्याची बिस्किटं आणि १ किलोची सोन्याची प्लेट आढळून आली. एआययूने हे सोनं जप्त केलं असून अटक व्यक्तीची चौकशी सुरु केली आहे. 


Web Title: Two kg of gold smugglers to the international airport
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.